इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५ वा हंगाम यावर्षी खेळला गेला. हंगामात यावर्षी १० संघ खेळले असून चार वेळा ट्रॉफी जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्जने मात्र चाहत्यांची निराशा केली. सीएसके गुणतालिकेत ९ व्या स्थानावर राहिला. परंतु त्यांचा युवा वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंगने चांगलीच प्रसिद्धी मिळवली. सिमरजीतने गोलंदाजी चांगली केलीच, पण त्याने स्पर्धा सुरू असताना सांगितलेल्या एका किस्स्यानंतर तो अधिकच चर्चेत आला होता.
सिमरजीत सिंग (Simarjeet Singh) देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करतो. तो भारताच्या १९ वर्षाखालील संघासाठी देखील खेळला आहे. सिमरजीने चेन्नई सुपर किंग्जसाठी एका व्हिडिओत खास किस्सा सांगितला आहे. व्हिडिओत त्याने सांगितले आहे की, राष्ट्रीय संघात निवड झाल्यानंतर तो विमानाने रवाना होणार होता, पण त्याच्या काही तास आधी एक फोन आला आणि त्याला संघातून वगळले गेल्याची माहिती दिली गेली.
फ्लाईटने रवाना होण्याच्या काही तास आधी मिळाली वाईट बातमी
त्याने सांगितले की, पहिल्यांदाच माझी निवड भारतीय संघात झाली होती. मला १९ वर्षाखालील आशिया चषकासाठी निवडले गेले होते. ज्या दिवसी विमानाने रवाना व्हायचे होते, त्याच दिवशी मला एक फोन आला. मला सांगितले गेले की, तू यापूर्वीही आशिया चषक खेळला आहे, त्यामुळे नियमानुसार आता तू खेळू शकत नाही.
सिमरजीतने पुढे सांगितले की, सकाळी ७ वाजता माझी प्लाईट होती, पण रात्री ११ वाजता मला फोन आला की, मी आता संघाचा भाग नाहीये. त्यानंतर माझे ह्रदय तुटले होते. सिमरजीतने असेही सांगितले की, या घटनेनंतर माझ्या आई वडिलांनी सांगितले की, तु आज जिथे आहेस, त्याचा अभिमान असला पाहिजे. त्यामुळेच मी गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवला.
दरम्यान, यावर्षी आयपीएल स्पर्धा सुरू होण्याच्या आधी मेगा लिलावा आयोजित केला गेला होता. सीएसकेने मेगा लिलावात सिमरजीत सिंगला त्याची बेस प्राईस २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्याच्या आदी सिमरजीत रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रणजी ट्रॉफी: अंतिम सामन्यात चौथ्या दिवशीही मध्य प्रदेश पडतोयं मुंबईवर भारी!
‘त्या’ एतिहासिक सामन्याचे तिकीट पाहून कपिल देव भावुक
फक्त कौतुकच करावं अशी ब्रायन लाराची ४०० धावांची अविस्मरणीय खेळी