आयपीएल 2019 चा लिलाव मंगळवारी (18 डिसेंबर) जयपूर येथे पार पडला. जयदेव उनाडकट मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यासह तमिळनाडूचा वरुण चक्रवर्थीही यावर्षी सर्वात महागडा खेळाडू ठरला. या दोघांनाही प्रत्येकी 8 कोटी 40 लाखांची बोली लागली आहे.
उनाडकटची मागील आयपीएलची कामगिरी बघता आता त्याला मिळालेली रक्कम यावर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
“मी मागच्या आयपीएलमध्ये 2-3 सामने सोडता बाकीच्या सामन्यांमध्ये चांगला खेळलो आहे. तसेच मी बोलीच्या आकड्याचा कोणताच विचार केला नव्हता. संघ माझी स्थानिक क्रिकेटमधील कामगिरी बघून त्यांच्या संघात मला घेण्याचा प्रयत्न करत होते”, असे उनाडकट म्हणाला.
उनाडकटने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 8 सामन्यात 4.27च्या इकॉनॉमी रेटने16 विकेट्स घेतल्या आहेत. तर सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने छत्तीसगड विरुद्ध एकाच सामन्यात सात विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
“मी रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी प्रमाणेच देवधर ट्रॉफीमध्ये चागंली कामगिरी केली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र विरुद्धच्या सामन्यात मी संघाचे नेतृत्वही केले असून तो सामनाही जिंकला होता”, असेही उनाडकट म्हणाला.
2017च्या आयपीएलमध्ये उनाडकटने रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळताना 12 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या होत्या. यामुळे तो 2018च्या वर्षी सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला 2018 च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने 11.5 कोटीमध्ये संघात घेतले होते.
मागील आयपीएलच्या हंगामात उनाडकतने फारसी चांगली कामगिरी केली नव्हती. त्याने 15 सामन्यात 44.18च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या होत्या. म्हणून राजस्थानने त्याला मुक्त केले होते. मात्र यावेळेही उनाडकटला राजस्थान रॉयल्सने 8 कोटी 40 लाख रुपयांची बोली लावत संघात परत घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–७ तासांत आयपीएलमध्ये १०६ कोटींची उधळणं
–माझं काय चुकलं सांगा, आयपीएलमध्ये स्थान न मिळालेल्या खेळाडूचा त्रागा
–तो खेळाडू आता खेळत असता तर आयपीएलमध्ये मिळाले असते तब्बल २५ कोटी