fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताचा हा खेळाडू म्हणतो, ‘तो’ व्हिडीओ पाहून वाईट वाटेल

February 10, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

शनिवारी (8 फेब्रुवारी) इडन पार्क (Eden Park), ऑकलंड (Auckland) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI Match) पार पडला. हा सामना न्यूझीलंडने 22 धावांनी जिंकला. तसेच मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारताचा युवा फलंदाज नवदीप सैनीने (Navdeep Saini) आपली भूमिका मांडली आहे.

या सामन्यात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि सैनीच्या जोडीने 8 व्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी करत भारताला विजयाच्या जवळ नेले होते. परंतु सैनी मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात जेमीसनच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे त्याला हा सामना भारताला जिंकून देता आला नाही.

या सामन्यात सैनीने 49 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 45 धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याचबरोबर, जडेजानेही 55 धावांची उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली.

सामन्यानंतर सैनी म्हणाला की, “जेव्हा मी स्वत:चा बाद होण्याचा व्हिडिओ पाहिल तेव्हा मला खूप वाईट वाटेल. जर मी बाद झालो नसतो तर निकाल वेगळाच असता. मी संघाला विजयाच्या इतक्या जवळ घेऊन गेलो होतो. अजून जवळ घेऊन जाऊ शकलो असतो. या गोष्टीसाठी मला वाईट वाटेल.”

“आम्हाला वाटले की, खेळपट्टी सपाट आहे आणि जर आम्ही शेवटपर्यंत टिकून राहिलो तर आम्ही विजयाच्या जवळ गेलो असतो. त्यासाठी आम्ही अधिकाधिक धावा करण्याचा प्रयत्न करत होतो. तसेच आम्हाला हा सामना शेवटपर्यंत घेऊन जायचा होता.”

“त्यावेळी जडेजाने मला सांगितले की, जर मारण्यासारखा चेंडू असेल तरच मार, नाहीतर 1-2 धावा घे. संयमाने खेळ. आपण सामन्याला शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकतो,” असेही सैनी यावेळी म्हणाला.

या सामन्यात भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि मयंक अगरवाल (Mayank Agarwal) यांच्या सलामी जोडीने संघाला जोरदार सुरुवात करून दिली नाही. तसेच कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul), केदार जाधव (Kedar Jadhav) यांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. शेवटी त्यामुळे भारतीय संघाला 22 धावांनी पराभूत व्हावे लागले.

असा आहे प्रियम गर्गच्या टीम इंडियाचा १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या फायनलपर्यंतचा प्रवास…
https://t.co/z36hZAcHj4#म #मराठी #Cricket #U19CWC #U19CWCFinal #INDvBAN #TeamIndia

— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020

असा आहे टीम इंडिया आण १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा इतिहास
वाचा👉https://t.co/1UFSxJmOtZ👈#म #मराठी #Cricket #U19CWC #U19CWCFinal #INDvBAN #TeamIndia

— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020


Previous Post

…तर किंग कोहली भारताबाहेरही करणार मोठा विक्रम

Next Post

भारत-बांगलादेश खेळाडूंमध्ये धक्काबुक्की, व्हिडिओ झाला व्हायरल

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Photo Courtesy; Twitter/@anavin74
Covid19

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/@IPLT20.com
IPL

कृणाल पंड्याच्या ‘सुपर थ्रो’ने आरसीबी चाहत्यांचा रोखला होता श्वास; पाहा डिविलियर्सला धावबाद केलेला तो क्षण

April 10, 2021
Next Post

भारत-बांगलादेश खेळाडूंमध्ये धक्काबुक्की, व्हिडिओ झाला व्हायरल

दिग्गजांनी खेळलेल्या बुशफायर क्रिकेट बॅश सामन्यातून जमा झाले कोट्यावधी रुपये; ऐकून व्हाल थक्क

वर्ल्डकप फायनलनंतर खेळाडूंमध्ये झालेल्या भांडणाबद्दल कर्णधार प्रियम गर्ग म्हणाला...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.