भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातही कामगिरी चांगली आहे. विशेष म्हणजे तिन्ही प्रकारात ५० पेक्षा अधिकची सरासरी असणारा तो सध्यातरी एकमेव फलंदाज आहे. तसेच त्याने मारलेला कव्हर ड्राईव्हचेही अनेक जण चाहते आहेत.
नुकतेच इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बेलनेही स्पोर्ट्सकिडाच्या फेसबुक पेजवर बोलताना विराटच्या फलंदाजीचे तसेच त्याच्या कव्हर ड्राईव्हचे कौतुक केले आहे. तसेच सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये विराटचा कव्हर ड्राईव्ह सर्वोत्तम असल्याचेही तो म्हणाला. तसेच कोहलीच्या फटक्यांच्या भात्यातील कव्हर ड्राईव्ह हा त्याचा अविभाज्य भाग असल्याचेही बेलने नमुद केले.
बेल म्हणाला, ‘मला तंत्रशुद्ध फलंदाज आवडतात. तो सध्याच्या काळात कदाचित सर्वोत्तम आहे. जागतिक क्रिकेटमध्ये विराटच्या कव्हर ड्राईव्हला दुर्लक्षित करणे कठिण आहे.’
बेलही क्रिकेट खेळत असताना त्याच्या ताबडतोड फटक्यांसाठी ओळखला जात होता. तसेच त्याचा फटके मारण्याचा टायमिंगही चांगला असायचा. त्याने ११८ कसोटी सामने खेळताना २२ शतके आणि ४६ अर्धशतकांसह ४२.६९ च्या सरासरीने ७७२७ धावा केल्या आहेत. तसेच १६१ वनडे सामन्यात ४ शतके आणि ३५ अर्धशतकांसह ५४१६ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
टीम इंडियाचा हा खेळाडू म्हणतो, माझ्याआधी सगळेच एकमेकांना भेटतील, व्हिडिओ पण…
ये दोसती हम नही तोड़ेंगे! १९ वर्षीय जेमिमाहचं हे खास गाणं आहे तिच्या संघसहाकाऱ्यांसाठी
किंग्ज ११ पंजाब सोडून दिल्ली संघात जाण्याचे कारण अखेर अश्विनने सांगितलेच