fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

‘हा’ खेळाडू म्हणतोय, मला डिसेंबरमध्येच झाला होता ‘कोरोना’

मुंबई । कोरोना व्हायरसने संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवला आहे. युरोप आणि अमेरिका खंडात तर या व्हायरसने जबरदस्त तांडव निर्माण केले आहे. इंग्लंडलाही या भयानक विषाणूचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडचे माजी अष्टपैलू खेळाडू इयान बॉथमने मोठा दावा केला आहे की, या वर्षाच्या सुरुवातीला डिसेंबर- जानेवारी महिन्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांना फ्ल्यू झाला आहे, असे वाटले.

बॉथम गुडमॉर्निंग ब्रिटनशी बोलताना म्हणाले की, “सहा महिन्यांपूर्वी या आजाराविषयी कुणालाच काही कल्पना नव्हती. यांच्या विषयीकधी ऐकले देखील नव्हते. मलादेखील कोरोना  विषाणूने घेरले होते. डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यात आणि जानेवारीच्या सुरुवातील याची लागण झाली होती. मला वाटले की, हा फ्ल्यू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा आजार अजून वाढतच आहे. अंधाऱ्या रात्रीसारखी ही गोष्ट आहे. पाहूयात पुढे काय होते ते.”

बॉथम यांनी लोकांना आवाहन केले की, “अशा कठीण प्रसंगात लोकांनी धैर्य दाखवले पाहिजे. काही दिवसांतच परिस्थिती पूर्वपदावर येइल अशी आशा देखील बाळगूयात.  काही दिवसातच लोक पूर्वीसारखे घराबाहेर पडतील. कोरोना क्रिकेटच्या सर्व मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यार आले आहेत. 8 जुलैपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पण क्लब क्रिकेट अजूनही बंदच आहे.”

“क्रिकेट लवकरच पुनरागमन करेल. कोरोनात क्रिकेट खेळला जाऊ शकतो. या खेळात कोणताच शारीरिक संपर्क होत नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्स आपोआप पाळले जाते. क्लब क्रिकेट पुन्हा सुरू करण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. लवकरच क्लब क्रिकेट वरती निर्णय येईल,” असे डरहमचे अध्यक्ष असलेले बॉथम यांनी सांगितले.

इयान बॉथम भारतीय कर्णधार विराट कोहली यांचे चाहते आहेत. तो सध्याच्या घडीला सर्वश्रेष्ठ फलंदाज असल्याचे यापूर्वी त्यांनी सांगितले होते.

You might also like