fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने आयपीएलमध्ये न खेळण्याचा दिला सल्ला

Ian Chappell feels well-paid Australian cricketers should pick domestic competitions over cash-rich IPL

मुंबई । जगातील सर्वात मोठा पैसा कमवून देणारी क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएल अर्थात इंडियन प्रमियल लीग. जगातील सर्वच खेळाडू ही आयपीएल लीग सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सध्या जगासह भारतातही कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे यंदाची 13 वी आयपीएल स्पर्धा ही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू इयान चॅपल यांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये न खेळण्याचा सल्ला दिला आहेत

मुळात दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू यंदाच्या वर्षाची आयपीएल व्हावी अशी इच्छा व्यक्त करत आहेत. यात पॅट कमिन्स आणि डेव्हिड वॉर्नर आघाडीवर आहेत. इयान चॅपल एका संकेतस्थळाशी बोलताना म्हणाले की, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आयपीएल ऐवजी ऑस्टेलियात होणाऱ्या स्थानिक स्पर्धेमध्ये खेळावे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड या खेळाडूंना भरपूर पैसा देतो. त्यामुळे आयपीएलमध्ये त्यांनी खेळू नये.

ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोंबर महिन्यात आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहेत परंतू कोबी नाइन्टीन या विषाणूने जगभर थैमान घातल्याने यंदाची स्पर्धा होण्याची शक्यता कमी आहे. याच कालावधीत बीसीसीआय आयपीएलचे नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू करत आहे. याच दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये शेफिल्ड शिल्ड स्पर्धा होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आयपीएल ऐवजी या स्थानिक स्पर्धेत खेळण्याचे आव्हान चॅपल यांनी केले आहे.

चॅपल म्हणाले की, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड खेळाडूंना चांगले पैसे मोजतो. त्यांच्या फिटनेससाठी विशेष काळजी घेतो. आयपीएलचा संघ मालकांनी तेरा ऑस्ट्रेलिया खेळाडूंसोबत करार केला आहे. त्यामध्ये वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला कोलकाता नाइट रायडर्स संघाने 15.5 करोडो रुपये देऊन करार केला आहे. यंदाच्या वर्षांतला सर्वात विदेशी महागडा खेळाडू आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड यांच्यातील संबंध चांगले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विरोध करणार नाहीत. दोन्ही क्रिकेट बोर्ड पैसे कमवण्यासाठी एकमेकाला चांगले सहकार्य करतात. त्यामुळे चॅपल यांच्या विधानाचा फारसा परिणाम होणार नाही.

You might also like