भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ५ वनडे सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर यापूर्वी झालेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेत देखील भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला होता. या मालिकेत कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या होत्या. तर केएल राहुल धावा करण्यास अपयशी ठरला होता. या मालिकेनंतर नुकतेच आयसीसीने टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. यात कर्णधार विराट कोहलीला फायदा झाला आहे. तर केएल राहुलची घसरण झाली आहे.
इंग्लंड विरुद्ध झालेल्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने मालिकेतील ५ सामन्यात २३१ धावा केल्या होत्या. तसेच केएल राहुलला देखील पहिल्या ४ टी२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु त्याला अवघ्या १५ धावा करता आल्या होत्या.
नवीन टी२० क्रमवारी जाहीर करण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आयसीसी टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानी होता. तर केएल राहुल चौथ्या स्थानी होता. त्यानंतर इंग्लंड संघाविरुद्ध केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विराट कोहली ७६२ गुणांसह चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे. तर केएल राहुल याने केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याची ७४३ गुणांसह पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान कायम आहे.
↗️ Batsmen Virat Kohli, Devon Conway move up
↗️ Adil Rashid climbs up one spot in bowlers rankingsThe weekly updates of the @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings are out!
Full list: https://t.co/EdMBsm6zwM pic.twitter.com/IzroX6YUqT
— ICC (@ICC) March 24, 2021
आयसीसीने जाहीर केलेल्या टी -२० यादीतील टॉप१० फलंदाज
१) डेव्हिड मलान (इंग्लंड )
२) ऍरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया)
३) बाबर आजम (पाकिस्तान)
४) विराट कोहली (भारत)
५) केएल राहुल (भारत)
६) वॅन दर दुसेन (दक्षिण आफ्रिका)
७) ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
८) मार्टिन गप्टील (न्यूझीलंड)
९) ड्वेन कॉनवे (न्यूझीलंड )
१०) हजरतउल्लाह जजई (अफगाणिस्तान)
महत्त्वाच्या बातम्या –
विराटच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय मांजरेकरांनी साधला निशाणा, म्हणाले….
श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ‘हे’ खेळाडू आहेत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत