आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) आज(22 जानेवारी) 2018 या वर्षातील पुरस्कार जाहिर केले आहेत. या पुरस्कारांमध्ये विराट कोहलीचाच बोलबाला राहिला असून त्याने आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावले आहेत.
विराटला आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार तसेच 2018 या वर्षातील सर्वोत्तम पुरूष वनडे क्रिकेटपटू आणि कसोटीपटू असे दोन पुरस्कारही विराटने पटकावले आहेत.
हे तीनही पुरस्कार एकाच वर्षात पटकावणारा विराट पहिलाचा क्रिकेटपटू ठरला आहे. यावर त्याने ‘तो खूप खूष आहे’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
“मी खूप आनंदी असून या वर्षात केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. संघानेही यावर्षात उत्तम कामगिरी केली असून मी स्वत:च्या कामगिरीतही सुधारणा केली आहे”, असे विराट म्हणाला.
ICC Men's Cricketer of the Year ✅
ICC Men's Test Cricketer of the Year ✅
ICC Men's ODI Cricketer of the Year ✅
Captain of ICC Test Team of the Year ✅
Captain of ICC Men's ODI Team of the Year ✅Let's hear from the man himself, @imvKohli! #ICCAwards 🏆 pic.twitter.com/3M2pxyC44n
— ICC (@ICC) January 22, 2019
या आयसीसीच्या पुरस्कारांसाठी 01 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील खेळाडूंची कामगिरी लक्षात घेतली होती. विराटने या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 37 सामन्यातील 47 डावात 68.37 च्या सरासरीने 2735 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 11 शतकांचा आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.
आयसीसीने 2018 चे वनडे आणि कसोटीचा 11 जणांचा सर्वोत्तम संघही जाहीर केला असून या दोन्ही संघाचा कर्णधारही विराटला करण्यात आले आहे.
तसेच सलग दोन वर्षे आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवणारा विराट पाँटिंग नंतरचा दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयसीसी पुरस्कारात बाजी मारणाऱ्या किंग कोहलीने केले हे खास ५ विक्रम
–या ४ भारतीय क्रिकेटपटूंना २००४पासून मिळाले आहेत सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचे पुरस्कार
–२१वर्षीय रिषभ पंत ठरला आयसीसीचा ‘उद्योन्मुख खेळाडू’