दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला सोमवारपासून (३ जानेवारी) प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला होता. दरम्यान याच सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे (Slow over rate) भारतीय संघाचे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील गुण कमी करण्यात आले होते. आता याबाबत राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ब्रिस्बेनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात, इंग्लंड संघाने ८ षटक कमी फेकले होते. ज्यामुळे त्यांचे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील ८ गुण कमी करण्यात आले होते. याबाबत बोलताना राहुल द्रविड म्हणाले की, “आयसीसी स्पष्टपणे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशिक्षक म्हणून हे त्रासदायक आहे आणि अनेकदा कठीण वाटते. हे आम्हाला षटकांची गती वाढवण्यासाठी प्रेरित करत असते.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “आयसीसीने आता गुणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मला काही एक अडचण नाहीये. परंतु परिस्थितीनुसार आम्हाला थोडी सूट मिळायला हवी. गेल्या वेळी आमचे काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. अर्थात आम्हाला थोडी सूट दिली होती, पण कधी कधी तसे होत नाही. तुम्ही किती मिनिटे गमवाल हे सांगणे कठीण आहे.”
स्लो ओव्हर रेटपासून वाचण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत बोलताना राहुल द्रविड म्हणाले की, “जेव्हा जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्यावेळी फिजीयोने मैदानात अधिक वेळ घेतला होता. त्यानंतर चेंडू बदलण्याचा प्रकार देखील घडला होता. ज्यामुळे वेळ वाया गेला होता.”
भारतीय संघ ४ वेगवान गोलंदाजांसह खेळत आहे, ज्यामुळे षटकांची गती कमी होत असते. अशावेळी फिरकी गोलंदाज मोलाची भूमिका पार पाडत असतात. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना सोमवार (३ जानेवारी) पासून जोहान्सबर्गच्या मैदानावर सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
न्यू इयर बोनस! रणजी ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने खेळाडूंना केले मालामाल; वाचा सविस्तर
सलामीवीर की फिनीशर कोणती भूमिका आवडेल? वेंकटेश अय्यरने दिले ‘असे’ उत्तर
हे नक्की पाहा :