काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी म्हटले होते की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सर्वाधिक पैसा भारतीय बाजारातून मिळतो. त्यामुळे त्यांच्या विधानामध्ये किती तथ्य आहे? बीसीसीआय खरंच आयसीसीला निधी पुरवते का? बीसीसीआय आपल्या कमाईतून आयसीसीवर नियंत्रण ठेवते का? असे अनेक प्रश्न चर्चेत आले. याच गोष्टींबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
भारतीय क्रिकेट बोर्ड जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयसमोर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडसारखे क्रिकेट बोर्ड देखील मागे पडले आहेत. बीसीसीआय दरवर्षी आयपीएलमधून मोठ्या प्रमाणावर कमाई करत असते. जगभरातील नामांकित कंपन्यासोबत बीसीसीआयचे करार झाले आहेत. यात एमपीएल, पेटीएम, ड्रीम इलेव्हन, अंबुजा सिमेंट, बायजुज, स्टार स्पोर्ट्ससारख्या अनेक मोठ्या कंपन्या आहेत.
कोरोना सारख्या महामारीत क्रिकेट बोर्डाच्या कमाईत मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची शक्यता होती. पण बीसीसीआयचे या महामारीच्या काळात मोठे नुकसान झालेले नाही. यावर्षी ‘मे’ मध्ये आलेल्या अहवालानुसार बीसीसीआयचे नुकसान झालेले नाही. यावर्षी बीसीसीआयने एकूण ३७३० कोटी रुपये कमाई केली आहे, तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाची एकूण कमाई २८४३ कोटी रुपये झाली आहे. याशिवाय इंग्लड क्रिकेट बोर्डाची २१३५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
मंडळांना क्रिकेट फंडिंगचा बहुतांश भाग आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदच्या वतीने होत असते. सद्यस्थितीत शंभराहून अधिक देशांना जवळ जवळ १.८ बिलियन डॉलर अनुदान दिले जात आहे. आयसीसीला बहुतांश निधी हा जागतिक आयोजनामधून येत असतो. ज्यात पुरुष आणि महिला यांचे एकदिवसीय आणि टी२० विश्वचषक स्पर्धांचे आयोजन देखील सामील आहे.
१. प्रसारण (मीडिया) अधिकार
स्टार स्पोर्ट्सने जगभरातील २०१५ ते २०२३ पर्यंतचे सर्व अधिकार दोन मिलियन डॉलरमध्ये खरेदी केले होते. आयसीसीकडून अनुमोदन मिळाल्यावर ‘ब्रॉडकास्टर’ ‘स्टारला’ पैसे देऊन आपल्या भागात कार्यक्रम प्रसारीत करत असतात. जसे स्काय (युके), फॉक्स स्पोर्ट्स (ऑस्ट्रेलिया), सुपर स्पोर्ट ( सहारा आफ्रिका).
२. प्रायोजक अधिकार
आयसीसीच्या बजेटमध्ये जवळ जवळ ७०० मिलियन डॉलर २०१५-२३ या कालावधीत जमा होतील. यात चषकाचे नामकरण अधिकार आणि अन्य प्रमुक सौदे देखील आहेत.
२०१५-२३ या कालावधीत आयसीसीकडून मिळणारे अनुदान (मिलियन डॉलर)
१. भारत- ४०५ मि (५१मि / वर्ष)
२. इंग्लड – १३९ मि ( १७ मि/ वर्ष)
३. ऑस्ट्रेलिया – १२८ मि (१६ मि/वर्ष)
४. बांगलादेश – १२८ मि (१६ मि/वर्ष)
५. न्यजीलंड – १२८ मि (१६ मि/वर्ष)
६. पाकिस्तान – १२८ मि (१६ मि/वर्ष)
७. द. आफ्रिका – १२८ मि (१६ मि/वर्ष)
८. श्रीलंका – १२८ मि (१६ मि/वर्ष)
९. वेस्टइंडिज – १२८ मि (१६ मि/वर्ष)
१०. झिम्बाब्वे – ९४ मि (१२ मि/ वर्ष)
११. अफगाणिस्तान- ४० मि (५ मि/ वर्ष)
१२. आयर्लंड – ४० मि (५ मि/ वर्ष)
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच! हरभजन सिंगला फ्रान्समधील युनिव्हर्सिटीने दिली मानद डॉक्टरेट पदवी; ‘हे’ आहे कारण
कर्णधार मनीष पांडेनेही लढवली धोनीसारखीच युक्ती अन् पोलार्डची मिळवली विकेट, पाहा व्हिडिओ