पाकिस्तान टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्यांनी बुधवारी (9 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 7 विकेट्सने पराभव केला. त्यांचा हा विजय काहींच्या पचनी पडलेला दिसत नाही, कारण काहींनी पाकिस्तानला ट्रोल केले, त्याचबरोबर आयसीसीला ट्वीटरवर चांगलेच ट्रोल केले आहे.
एका नेटकऱ्याने आयसीसीचा फुलफॉर्म बदलत त्याला ‘इस्लामाबाद क्रिकेट कौंसिल असे म्हणत सामना फिक्स होता’ हे ट्वीट केले. दुसऱ्या नेटकऱ्याने ‘सगळे काही फिक्स आहे. आयसीसी इस्लामाबाद क्रिकेट कौंसिल झाली आहे,’ असे ट्वीट केले. एकाने तर हद्दच केली. त्याने ट्वीटमध्ये लिहिले, ‘पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांना आयसीसी आणि पंचांच्या मदतीने पराभूत केले आहे.’ अशाप्रकारचे अनेक ट्वीट्स केले गेले.
ICC= Islamabad Cricket Council 😌😌😌 https://t.co/hK6VvQ9CyC
— Bumrah is God (@EternalBlizard_) November 9, 2022
Is China President bribing umpires to help Pakistan? 😱
ICC = Islamabad Cricket Council ??#ShakibAlHasan #T20worldcup22 pic.twitter.com/o8Fs65RPkn— Sanat Prabhu (@TheCovertIndian) November 9, 2022
या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात उत्तम कामगिरी केली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिन ऍलन (Finn Allen) 4 धावांवरच बाद झाल्याने केन विल्यमसन याने डाव सांभाळला. त्याने 42 चेंडूत 46 धावा केल्या. त्याला डॅरिल मिचेल याने योग्य साथ दिली. मिचेलने 35 चेंडूत 3 चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने नाबाद 53 धावा केल्या. यामुळे न्यूझीलंडने 20 षटकात 4 विकेट्स गमावत 152 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान या सलामीजोडीने स्फोटक खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. यामध्ये बाबरने 53 धावा केल्या. तर 57 धावा करत रिझवान ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद हॅरीस फलंदाजीला आला. त्याने 26 चेंडूत 30 धावा केल्या आणि पाकिस्तानला विजयाच्या जवळ नेले. हा सामना पाकिस्तानने 5 चेंडू आणि 7 विकेट्स शिल्लक राखत जिंकला. ICC got trolled by Pakistan’s win
या स्पर्धेतील अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. यामध्ये पाकिस्तानशी कोण भिडणार हे गुरूवारी (10 नोव्हेंबर) होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य सामन्यातून कळेलच.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उपांत्य सामना जिंकल्यानंतर बाबरने मानले चाहत्यांचे आभार; म्हणाला, ‘याठिकाणी खेळताना…’
VIDEO: पाकिस्तान जिंकल्याने शोएब मलिक-वकार युनूसने स्टुडिओतच धरला ठेका, व्हिडिओ होतोयं व्हायरल