आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने मंगळवारी (17 जानेवारी) नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. मात्र, त्यांना ही क्रमवारी अवघ्या दोन तासांच्या फरकात पुन्हा बदलावी लागले. सुरुवातीला भारतीय संघाला क्रमवारीत अव्वल स्थानी दाखवण्यात आलेले. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले गेले.
मंगळवारी आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. पहिल्यांदा दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ या क्रमवारीत 115 गुणांसह पहिल्या स्थानी दिसत होता. तर, ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 111 गुण दिसत होते. मात्र अवघ्या दोन तासांच्या अंतराने आयसीसीने ते ट्विट डिलीट करत नवी क्रमवारी अपडेट केली. यांना क्रमवारी ऑस्ट्रेलिया संघाचे 126 गुण दिसत आहेत. आयसीसीच्या तांत्रिक समितीकडून झालेल्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय संघाने मागील वर्षाच्या अखेरीस बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली होती. तर, ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 3-0 असा व्हाईट वॉश दिलेला. त्यानंतर नवीन वर्षात प्रथमच आयसीसीकडून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली. या नव्या क्रमवारीत इंग्लंड संघ 107 गुणांसह तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका 102 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानविरुद्धची मालिका अनिर्णित राखण्यात यश मिळवलेला न्यूझीलंड संघ पाचव्या व पाकिस्तानचा संघ सहाव्या स्थानी आहे. त्यानंतर श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश व झिम्बाब्वे यांचा क्रमांक लागतो.
सध्या या सर्व संघांमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. यामध्ये केवळ भारत, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका याच तीन संघांचे आव्हान शिल्लक असून, भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होऊ शकतो. पुढील महिन्यात भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जून महिन्यात ओव्हल येथे होईल.
(ICC Made Mistake In New Test Rankings Show India On Top)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! टीम इंडियाला मोठा झटका, प्रमुख खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूचा समावेश
‘या’ पक्षाने केली सूर्यकुमार यादवची नक्कल! संघसहकारी अर्शदीपही म्हणाला, ‘पाजी तुमची कॉपी…’