---Advertisement---

ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी 3 खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट, कोण आहे तो नशीबवान भारतीय?

Team-India
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच आयसीसीने प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी निवडलेल्या 3 खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. मंगळवारी (दि. 07 नोव्हेंबर) आयसीसीने 3 खेळाडूंना या खास पुरस्कारासाठी निवडले आहे. यामध्ये एक वेगवान गोलंदाज, एक यष्टीरक्षक फलंदाज आणि एका अष्टपैलू खेळाडूचा समावेश आहे. या तिघांपैकी एक भारतीय खेळाडूही आहे. चला तर, याविषयी जाणून घेऊयात…

आयसीसीने प्लेअर ऑफ द मंथ (ICC Player of The Month) पुरस्कारासाठी निवडलेल्या 3 खेळाडूंमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नावाचा समावेश आहे. बुमराहने ऑक्टोबर महिन्यात आपल्या गोलंदाजीने कमाल केली आहे. ऑक्टोबर 2023साठी निवडलेल्या खेळाडूंमध्ये बुमराह याच्याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) आणि न्यूझीलंचा अष्टपैलू रचिन रवींद्र (Rachin Ravindra) यांचाही समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंनी विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत धमाल केली आहे. बुमराहने चेंडूने, डी कॉकने बॅटने आणि रचिनने बॅट आणि चेंडू दोन्हीतून कहर कामगिरी केली आहे.

क्विंटन डी कॉक याच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने मागील महिन्यात विश्वचषक स्पर्धेत 3 शतके झळकावली आहेत. त्याने संघासाठी ऑक्टोबर महिन्यात 431 धावा केल्या. याच महिन्यात त्याने यष्टीरक्षक म्हणून 10 झेल आणि एक यष्टीचीत बाद केले आहे. विश्वचषकात तो ऑक्टोबरमध्ये श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरुद्ध शतक झळकावण्यात यशस्वी ठरला होता.

दुसरीकडे, रचिनबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आपल्या पहिल्याच विश्वचषकात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्याने ऑक्टोबर महिन्यात स्पर्धेत न्यूझीलंड संघासाठी पहिल्या 6 सामन्यात 81.20च्या सरासरीने 406 धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचाही समावेश आहे. ही शतके त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली आहेत. याव्यतिरिक्त त्याने 3 विकेट्सही घेतल्या आहेत.

भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघासाठी विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी 12 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची इकॉनॉमी 4 धावा प्रति षटकपेक्षाही कमी राहिली आहे. त्यामुळे तो या महिन्यात आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार (ICC Player of The Month Award) जिंकण्याचा दावेदार आहे. (icc mens player of the month nominees for october revealed indian pacer jasprit bumrah in it)

हेही वाचा-
वर्ल्डकपमध्ये फ्लॉप ठरलेल्या श्रीलंकन संघाला सुट्टी नाही! एसएलसीचे नवे अध्यक्ष लावणार सर्वांना शिस्त
पाकिस्तानी खेळाडूने विराटला ‘स्वार्थी’ म्हणताच खवळला इंग्लंडचा दिग्गज; म्हणाला, ‘भारताने 8 संघांना…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---