पाकिस्तान विरुद्ध झिंबाब्वे संघात ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका झाली. ही मालिका पाकिस्तानने २-१च्या फरकाने जिंकली. या वनडे मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वनडे क्रमवारी यादी जाहीर केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने झिंबाव्बेविरुद्धच्या दमदार प्रदर्शनामुळे फलंदाजी क्रमवारी यादीत मोठी उडी घेतली आहे. तसेच झिंबाब्वेच्या काही खेळाडूंनाही फायदा झाला आहे.
फलंदाजांच्या क्रमवारी यादीविषयी बोलायचे झाले तर, झिंबाव्बे विरुद्धच्या मालिकेत आझमने २२१ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला १२ गुणांचा फायदा झाला आहे. विराट कोहली (८७१ गुण) आणि रोहित शर्मा (८५५ गुण)नंतर तो तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. तर झिंबाब्वेचा फलंदाज ब्रेंडन टेलर आणि सीन विलियम्सने पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी एक शतक जडले होते. त्यामुळे टेलर ४२व्या तर विलियम्स ४६व्या स्थानावर आला आहे.
गोलंदाजांच्या क्रमावारी यादीत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने ८ स्थानांची मोठी उडी घेतली आहे. यासह त्याने टॉप-२०मध्ये प्रवेश केला आहे. तर पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू वहाब रियाज ६ स्थानांची प्रगती करत ६०व्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच झिंबाब्वेचा गोलंदाज सिंकदर राजा या यादीत ६६व्या आणि डोनाल्ड ट्रिपनो ९०व्या स्थानावर आहे.
पाकिस्तान विरुद्ध झिंबाव्बे वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रंगतदार लढत झाली होती. हा सामना झिंबाब्वेने सुपर ओव्हरमध्ये खिशात घातला होता. त्यामुळे त्यांच्या खात्यात १० गुणांची भर पडली आहे आणि ते १४व्या स्थानावर आले आहेत. तर पाकिस्तानने २० गुणांची कमाई केली आहे. यासह त्यांनी संघांच्या क्रमावारी यादीत सहावे स्थान पटकावले आहे.
शतकांच्या ‘या’ मोठ्या विक्रमात पाकिस्तानी खेळाडूची हवा, विराट कोहलीवरही ठरला वरचढ
चुरशीच्या सामन्यात झिम्बाब्वेकडून पाकिस्तान पराभूत; बाबर आझमचे शतक व्यर्थ
नादच खुळा! हैदराबादने ‘या’ विक्रमात केली मुंबई- चेन्नईसारख्या बलाढ्य संघांची बरोबरी
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: प्रतिभा असूनही ‘हे’ पाच खेळाडू राहिले वंचित, नाही मिळाली संधी
मुंबईचे ३ धडाकेबाज खेळाडू, ज्यांना पुढील हंगामात केले पाहिजे रिलीझ
लईच वाईट! आयपीएल २०२०मधील ७ खेळाडू; जे कधीही विसरणार नाहीत हा हंगाम