---Advertisement---

शाब्बास रे पठ्ठ्या! ICC ODI Rankingमध्ये रोहितचा धमाका, ‘या’ क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच केले हैराण

Rohit-Sharma
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थातच, आयसीसीने बुधवारी (दि. 18 ऑक्टोबर) वनडे रँकिंग जाहीर केली. यामध्ये भारतीय संघाचा दमदार कर्णधार रोहित शर्मा याने गरुडझेप घेतली. त्याला 5 स्थानांचा फायदा झाला. विशेष म्हणजे, 10 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये रोहित 11व्या स्थानी होता. मात्र, आता तो ताज्या रँकिंगमध्ये सहाव्या स्थानी विराजमान झाला आहे. याव्यतिरिक्त फलंदाजांच्या ताज्या वनडे रँकिंगमध्ये अव्वल 10 खेळाडूंमध्ये भारताचे 3 फलंदाज सामील आहेत.

भारतीय सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याचे 818 पॉईंट्स आहेत. त्याच्याव्यतिरिक्त रोहित शर्मा (Rohit Sharma) 719 पॉईंट्ससोबत सहाव्या स्थानी आहे. तसेच, दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) 711 पॉईंट्ससह नवव्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, रोहित सध्या वनडे आणि कसोटीत अव्वल 10 खेळाडूंमध्ये असणारा एकमेव भारतीय आहे.

खरं तर, सध्या विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू असून यामध्ये रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने यादरम्यान एक शतकही झळकावले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितने 86 धावांची खेळी साकारली होती. तसेच, अफगाणिस्तानविरुद्ध त्याच्या बॅटमधून 131 धावांचा पाऊस पडला होता. आता रोहित वनडे विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाराही फलंदाज बनला आहे.

सध्या वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थानी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आहे. त्याचे 836 पॉईंट्स आहे. याव्यतिरिक्त क्विंटन डी कॉक तिसऱ्या, रासी व्हॅन डर ड्युसेन चौथ्या आणि हॅरी टेक्टर पाचव्या स्थानी आहे.

बाबरला गिलचा धोका
बाबर आझम याची बादशाहत शुबमन गिल याच्यामुळे धोक्यात आली आहे. गिल सध्या दुसऱ्या स्थानी आहे. दोघांमध्ये फक्त 18 पॉईंट्सचे अंतर आहे. अशात म्हटले जात आहे की, विश्वचषकादरम्यान गिलने एक किंवा दोन शतके झळकावली, तर तो बाबरला अव्वलस्थानावरून खाली खेचू शकतो. याव्यतिरिक्त रोहितही शानदार फॉर्ममध्ये आहे. रोहित जरी 6व्या स्थानी असला, तरी त्याची फलंदाजी पाहून असे म्हटले जाऊ शकते की, तो असाच खेळत राहिला, तर लवकरच वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थानी विराजमान बनू शकतो. दुसरीकडे, बाबरला आतापर्यंत फक्त 1 अर्धशतक करता आले आहे. (icc ODI ranking update team india is the only team to have 3 batters in the top 10 list know here)

हेही वाचा-
‘हा विजय विश्वचषक जिंकण्यापेक्षा…’, नेदरलँड्सच्या जबरदस्त विजयाबद्दल पाकिस्तानी खेळाडूचे मोठे भाष्य
लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडच्या मदतीसाठी स्टोक्स उतरणार मैदानात! प्रशिक्षकांनी दिली माहिती; म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---