आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. विराटने फलंदाजांच्या क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम राखले असून रोहित शर्माही दुसऱ्या स्थानी कायम आहे. त्याचवेळी गोलंदाजांच्या क्रमवारीतही भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तिसरे स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या दोन वनडे सामन्यात अनुक्रमे ८९ आणि ६३ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याचे ८७० गुण आहेत. रोहित शर्मा या मालिकेचा भाग नव्हता. कोरोना महामारीनंतर तो एकही वनडे सामना खेळला नाही. मात्र त्याने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या यादीत ८३७ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर ८१८ गुणांसह चौथ्या स्थानी आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच ७९१ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.
Ireland opener Paul Stirling moves up eight spots to join Glenn Maxwell at No.20 in the latest @MRFWorldwide ICC Men's ODI Rankings for batting.
📈 Full rankings: https://t.co/tHR5rKl2SH pic.twitter.com/vcG31uk72t
— ICC (@ICC) January 27, 2021
गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहच भारताकडून सर्वोत्कृष्ट स्थानी आहे. त्याने ७०० गुणांसह तिसरे स्थान कायम राखले आहे. या यादीत न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट अव्वल स्थानी आहे. त्याचे ७२२ गुण आहेत. तर ७०८ गुणांसह अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
↗️ Mehidy Hasan storms into top five
↗️ Mustafizur Rahman enters top 10
↗️ Shakib Al Hasan moves up 15 spotsBangladesh bowlers sizzle in the latest @MRFWorldwide ICC Men's ODI Player Rankings!
📈 Full rankings: https://t.co/tHR5rKl2SH pic.twitter.com/2uDyRgfznH
— ICC (@ICC) January 27, 2021
या यादीत बांग्लादेशचा ऑफस्पिनर मेहदी हसनने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दमदार कामगिरीने तब्बल नऊ स्थानांची प्रगती करत चौथे स्थान गाठले आहे. त्यामुळे चौथ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या ख्रिस वोक्सची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारतासाठी असे आहे आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचे समीकरण; इंग्लंड विरुद्ध या फरकाने जिंकावी लागेल मालिका
आयर्लंडविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर राशिदने केले मोठे वक्तव्य, म्हणाला
वेस्ट इंडीजच्या दोन खेळाडूंचे कोरोना अहवाल आले पॉझिटिव्ह, मुकणार या स्पर्धेला