आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 32वा सामना बुधवारी (दि. 01 नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळला जाणार आहे. हा सामना पुण्यातील एमसीए स्टेडिअमवर रंगणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. असे म्हटले जात होते की, न्यूझीलंड क्रिकेट संघात दिग्गज फलंदाज आणि नियमित कर्णधार केन विलियम्सन याचे पुनरागमन होईल, पण आता त्यांच्यासाठी वाईट बातमी समोर येत आहे.
केन विलियम्सन (Kane Williamson) पूर्णपणे डाव्या हाताच्या अंगठ्याच्या दुखापतीतून सावरला नाहीये. त्यामुळे केन विलियम्सन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर (Kane Williamson ruled out of match against south africa) पडला आहे. याची पुष्टी स्वत: न्यूझीलंड क्रिकेटने केली आहे.
आयपीएल 2023 स्पर्धेत झालेल्या दुखापतीनंतर, विलियम्सन दीर्घ काळानंतर न्यूझीलंडकडून 13 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्या सामन्यात त्याने नाबाद 78 धावा केल्या होत्या. मात्र, आपल्या डावादरम्यान धाव पूर्ण करताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू लागला होता. त्यामुळे तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला होता. नंतर त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर होण्याची पुष्टी झाली आणि सांगण्यात आले की, ऑक्टोबरमधील उर्वरित सामन्यात तो खेळू शकणार नाही.
अशात मंगळवारी (दि. 31 ऑक्टोबर) न्यूझीलंड क्रिकेटने सोशल मीडियाच्या माध्यमातून विलियम्सन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडल्याची माहिती दिली. त्यांनी पोस्ट करत म्हटले, “बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून केन विलियम्सन बाहेर पडला आहे. विलियम्सनने मागील दोन दिवसात नेट्समध्ये फलंदाजी केली आहे. मात्र, तो उद्याच्या सामन्यात पुनरागमन करणार नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पुन्हा एकदा त्याचे आकलन केले जाईल.”
Kane Williamson has been ruled out of Wednesday’s match against @ProteasMenCSA.
Williamson has batted in the nets the last two days but has been ruled out of a return to match action tomorrow.
He will be assessed again ahead of the side’s next match against @TheRealPCB. #CWC23 pic.twitter.com/c8TIJRe7cT
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 31, 2023
पाकिस्तान संघाविरुद्ध न्यूझीलंडचा पुढील सामना 4 नोव्हेंबर रोजी बंगळुरूत होणार आहे. अशात चाहत्यांना आशा आहे की, विलियम्सन लवकर फिट होईल आणि या सामन्यातही आपला जलवा दाखवेल. असे असले, तरीही न्यूझीलंड संघाने विलियम्सनच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी रचिन रवींद्र याच्याकडे सोपवली आहे, जिथे तो शानदार फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडत आहे. अशात संघाला पुढील सामन्यांमध्येही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. (icc odi world cup 2023 new zealand skipper kane williamson ruled out of match against south africa)
हेही वाचा-
सेमी-फायनलची जागा पक्की करण्यासाठी न्यूझीलंड-द.आफ्रिकेत झुंज! पुण्यात रंगणार ‘रन’युद्ध
चार पराभवानंतर पाकिस्तानने पाहिला विजय! बांगलादेशने गुंडाळला वर्ल्डकपमधून गाशा