आयर्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत २-० ने विजय मिळवताच भारतीय संघाने टी-२० क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
इंग्लंड विरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्याने व भारतीय संघाने आयर्लंडवर २-० असा विजय मिळवल्याने टी-२० क्रमवारीत बदल झाले आहेत.
आयसीसी टी-२० क्रमवारीत सध्या १३१ रेटींग्ससह पाकिस्तान अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय संघाचे रेटींग्स १२३ आहेत.
या क्रमवारीत तीसऱ्या स्थानी घसरण झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात फक्त एका रेटींग्सचा फरक आहे. ऑस्ट्रेलियाचे १२२ रेटींग्स आहेत.
येता काही दिवसात या क्रमवारीत लवकरच बदल होण्याची शक्यता आहे.
कारण या क्रमवारीतील अव्वल चार संघ पाकिस्तान, भारत, ऑस्ट्रेलिय आणि इंगल्ड संघाचे या काळात टी-२० सामने होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियामध्येही दिसणार पंड्या ब्रदर्स
–महिला हॉकी विश्वचषक: भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपालकडे