ऑक्टोबर 2020मध्ये ऑस्ट्रेलिया येथे आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सला (AB de Villiers) पुन्हा संघातून खेळण्याची संधी देण्यात येऊ शकते.
डिविलियर्सने मे 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु, संघातील युवा खेळाडूंना त्याच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याने तो संघात परत येण्याची शक्यता आहे.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात संघाचे नेतृत्व करणारा डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला असला तरी अद्याप फ्रँचायझी आधारित टी -२० स्पर्धांमध्ये सक्रिय आहे.
डिविलियर्सच्या संघातील पुनरागमनाविषयी बोलताना दक्षिण आफ्रिका संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर म्हणाले की, “जर तो चांगल्या प्रकारे खेळू शकत असेल आणि तो स्वत: संघातून खेळण्यासाठी तयार असेल. तर, तो दक्षिण आफ्रिका संघाकडून टी20 विश्वचषकात खेळू शकतो.”
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार बाऊचर म्हणाले की, ‘डिविलियर्स मीडिया आणि लोकांच्या चर्चेचा विषय असेल. मात्र, माझ्यासाठी नाही. माझे त्याच्याशी बोलणे झाले आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच कळेल की त्याच्याबद्दल काय निर्णय होणार आहे. मी प्रशिक्षकाचा कार्यभार हाती घेतल्यापासून सांगत आलो आहे की, मला विश्वचषक सामन्यात माझ्या सर्वश्रेष्ठ खेळाडूंनाच घेऊन जायचे आहे.’
डिविलियर्सने त्याच्या कारकिर्दीत 78 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळला आहे. ज्यात त्याने 26.12च्या सरासरीने आणि 135.16च्या स्ट्राइक रेटने 1672 धावा केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीगमध्ये डिविलियर्स ब्रिस्बेन हीटकडून खेळताना दिसला. यानंतर तो 29 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्येही खेळणार आहे.
आयपीएल २०२०: असे आहे सनरायझर्स हैद्राबादचे वेळापत्रक; जाणून घ्या कधी व केव्हा होणार सामने
वाचा????https://t.co/EpGiJCDDxX????#म #मराठी #Cricket #IPL2020 @SunRisers— Maha Sports (@Maha_Sports) February 17, 2020
हा दिग्गज म्हणतो, यावेळी ऑस्ट्रेलिया टीम इंडियाला करणार पराभूत, जाणून घ्या कारण
वाचा- ????https://t.co/Rjtn0sROVm????#म #मराठी #Cricket #TeamIndia #indvsaus— Maha Sports (@Maha_Sports) February 17, 2020