---Advertisement---

न्यूझीलंडचा पीएनजी संघावर 7 विकेट्सनं एकतर्फी विजय!

NZ
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 39वा सामना आज (17 जून) रोजी न्यूझीलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी (NZ vs PNG) यांच्यामध्ये खेळला गेला. ब्रायन लारा या स्टेडियमवर हा सामना रंगला होता. दोन्ही संघांचा यंदाच्या टी20 विश्वचषकातील शेवटचा साखळी सामना होता. या सामन्यात न्यूझीलंडनं पीएनजी संघाचा 7 विकेट्सनं दारुण पराभव केला. परंतु दोन्ही संघ टी20 विश्वचषकाच्या सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर पडलेले आहेत.

पीएनजी संघानं दिलेल्या 79 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून सलामीवीर डेव्हाॅन काॅनवेनं 32 चेंडूत सर्वाधिक 35 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं 2 चौकारांसह 3 उत्तुंग षटकार लगावले. तर कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरिल मिचेल यांनी 18 धावांची खेळी खेळून 79 धावांचं आव्हान गाठलं. पीएनजीसाठी काबुआ मोरियानं 2 तर सेमो कामियानं 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी न्यूझीलंडनं टाॅस जिंकून प्रथम पीएनजीसंघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात पीएनजी संघ 78 धावांवर सर्वबाद झाला. पीएनजीसाठी चार्ल्स अमिनी 17, नॉर्मन वानुआ 14 आणि सेसा बाऊनं 12 धावांची खेळी केली. तर न्यूझीलंडसाठी लाॅकी फर्ग्युसननं 4 षटक निर्धाव टाकून 3 विकेट्स त्याच्या नावी केले आणि इतिहास रचला. तर ट्रेंट बोल्ट, टिम साउथी, ईश सोढी यांनी 2 तर मिचेल सँटनरनं 1 विकेट घेतली.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

न्यूझीलंड- फिन एलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोढी, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

पापुआ न्यू गिनी- टोनी उरा, असद वाला(कर्णधार), चार्ल्स अमिनी, सेसा बाऊ, हिरी हिरी, चाड सोपर, किपलिन डोरिगा(यष्टीरक्षक), नॉर्मन वानुआ, अले नाओ, काबुआ मोरिया, सेमो कामिया

महत्त्वाच्या बातम्या-

आश्चर्यकारक! लाॅकी फर्ग्युसननं रचला इतिहास, टी20 विश्वचषकात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
न्यूझीलंडनं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
टी20 विश्वचषकादरम्यान गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---