आयसीसीनं या आठवड्यातील लेटेस्ट कसोटी क्रमवारी जारी केली आहे. या रँकिंगमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीशिवाय दक्षिण आफ्रिका-श्रीलंका, न्यूझीलंड-इंग्लंड आणि वेस्ट इंडिज-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीचाही समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला कसोटी फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा होऊन तो अव्वल स्थानावर पोहोचला आहे. जो रूटला एका स्थानाचं नुकसान होऊन तो दुसऱ्या स्थानावर घसरला. न्यूझीलंडचा केन विल्यमसन तिसऱ्या आणि भारताची यशस्वी जयस्वाल चौथ्या स्थानावर कायम आहेत. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड सहा स्थानांची झेप घेऊन पाचव्या, श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस एक स्थान पुढे सरकून सातव्या आणि दक्षिण आफ्रिकेचा टेम्बा बावुमा तीन स्थानांनी पुढे जाऊन सातव्या स्थानावर पोहोचला.
न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलची तीन स्थानांची घसरण झाली. तो आता आठव्या स्थानावर गेला आहे. भारताचा रिषभ पंत तीन स्थानांनी घसरुन नवव्या स्थानावर आला. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला तीन स्थानांचं नुकसान झालं असून तो 11 व्या स्थानावर पोहचला आहे. तर मार्नस लाबुशेन तीन स्थानांनी घसरून 13व्या स्थानावर पोहचलाय.
दिग्गज विराट कोहलीला या क्रमवारीत मोठं नुकसान सहन करावं लागलं. तो 6 स्थानांनी घसरून 20 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर बॉर्डर-गावस्कर मालिकेत पदार्पण करताना शानदार कामगिरी करणाऱ्या नितीश कुमार रेड्डी 6 स्थानांनी पुढे सरकून 69व्या स्थानावर पोहोचला आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीबद्दल बोलायचं झाल्यास, भारताचा जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स एका स्थानाच्या फायद्यासह चौथ्या स्थानावर पोहचला. रविचंद्रन अश्विन एका स्थानाच्या घसरणीसह पाचव्या स्थानावर आलाय. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क तीन स्थानांनी पुढे सरकून 11व्या, इंग्लंडचा गस ऍटकिन्सन 17व्या आणि दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज 18व्या स्थानावर पोहोचला आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर कायम आहे. तर बांगलादेशच्या मेहंदी हसन मिराजनं दोन स्थानांची झेप घेत दुसरं स्थान पटकावलं. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला तीन स्थानांचा फायदा होऊन तो आठव्या स्थानावर आलाय. तर रविचंद्रन अश्विन तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
हेही वाचा –
काय सांगता! वेळेवर न आल्यामुळे या खेळाडूला सोडून निघून गेली टीम इंडिया!
भारतीयांना खेळांमध्ये सर्वाधिक रस! गुगलच्या टॉप 10 मधील 5 सर्च खेळांशी संबंधित
मॅच न खेळता भारताने केला विश्वविक्रम, सामनाच्या 200 दिवस आधीच सर्व तिकिटांची विक्री!