आयसीसीने बुधवारी (१५ डिसेंबर) कसोटी क्रिकेटमधील नवीन क्रमवारी जाहीर केली. ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर (david warner) याने अप्रतिम फलंदाजी केली होती. त्याच्या प्रदर्शनानंतर त्याने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत चांगली सुधारणा केली आहे. वॉर्नरने कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली (virat kohli) याची बरोबरी केली आहे. आता विराट आणि वॉर्नरकडे एकसमान ७५६ गुण आहेत.
रोहित शर्मा (rohit sharma) याने कसोटी क्रमवारीतीत त्याचे पाचवे स्थान कायम ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने उल्लेखनीय कामगिरी करत दोन स्थानंची झेप घेतली आहे आणि क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. लाबुशेनने स्टीव स्मिथ आणि केन विलियम्सनला मागे सोडले आहे. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेडने पहिल्या १० फलंदाजांमध्ये स्वतःला सामील करून घेतले आहे. हेडने ऍशेसच्या पहिल्या सामन्यात शतक केले होते. या प्रदर्शनाच्या जोरावर त्याने कसोटी फलंदाजांच्या यादीत १० वा क्रमांक मिळवला आहे.
पाकिस्तानचा वेगावन गोलंदाज शाहीन अफ्रिदीने बांगलादेशविरुद्ध मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते. या प्रदर्शनानंतर त्याने कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. शाहीन अफ्रिदी आता गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अफ्रिदीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड आणि न्यूझीलंडचा दिग्गज टिम साउदी यांना मागे टाकले आहे. तसेच पाकिस्तानचा हसन अली देखील १० व्या क्रमांकावर आला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने ऍशेसच्या पहिल्या सामन्यात ७ विकेट्स मिळवल्या होत्या. कमिन्स गोलंदाजांच्या क्रमवारी पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
अष्टपैलूंच्या यादीत इंग्लंडचा दिग्गज बेन स्टोक्सला नुकसान झाले आहे. स्टोक्स यापूर्वी अष्टपैलूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता, आता तो दोन स्थानांनी खाली घसरून पाचव्या क्रमांकावर आला आहे. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन यांनी अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान गाठले आहे. या दौघांना एका स्थानाचा फायदा झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
मुंबई सिटी एफसीला विजयासाठी चेन्नईयन एफसीनं झुंजवले, अखेरच्या क्षणाला राहुल भेकेचा विजयी गोल
‘विनलेस’ ईस्ट बंगालविरुद्ध खेळ उंचावण्यास नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी उत्सुक