आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी (३० मार्च) ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचे आजी-माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. मात्र, रविंद्र जडेजा आणि आर अश्विन या भारताच्या अष्टपैलू खेळाडूंना फायदा झाला आहे.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत विराट कोहली १० व्या क्रमांकावर घसरला आहे, त्याच्या नावावर ७४२ पाॅइंट्स आहेत. तर रोहित शर्मा आठव्या क्रमांकावर घसरला आहे आणि त्याच्या नावावर ७५४ पाॅइंट्स आहेत. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाब्युशेन अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ, तिसऱ्या क्रमांकावर केन विलियम्सन आहे.
तसेच आयसीसीच्या कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत रविंद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर कायम आहे, तर अष्टपैलू खेळाडू आर अश्विन या यादीत दूसऱ्या क्रमाांकावर पोहचला आहे. त्यामुळे आता अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या दोन क्रमांकांवर दोन भारतीय खेळाडू आहेत.
फलंदाजांच्या यादीत सर्वाधिक फायदा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला (Usman Khawaja) झाला आहे, त्याला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीतील शानदार कामगिरीचा फायदा झाला. त्याने कसोटी मालिकांच्या ५ डावांत १६५ च्या सरासरीने ४९६ धावा केल्या आहेत. तो या क्रमवारीत ६ क्रमांकानी उडी घेत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत अनुक्रमे ९७, १६०, ४४*, ९१ आणि १०४* धावांच्या खेळी केल्या आहेत. पहिल्या दोन्ही कसोटी अनिर्णीत राहिल्या. परंतु तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने ११५ धावांनी विजय मिळवला.
Major changes in the latest @MRFWorldwide ICC Men’s Player Rankings for Tests and ODIs 👀
More ➡️ https://t.co/MsmAFEH2gG pic.twitter.com/5Cr3GbWccp
— ICC (@ICC) March 30, 2022
तसेच ख्वाजाने यापुर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत दोन्ही डावात शतक लगावली होती. त्यामुळे तो आता गुणतालिकेत डेविड वाॅर्नर, रिषभ पंत आणि ट्रेविड हेड आणि रोहित शर्माला मागे टाकत १२ व्या क्रमांकावरुन थेट ७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने ६ स्थानांची मोठी आघाडी घेतली आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारीत टाॅप १० खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ४ फलंदाजांचा समावेश आहे. मार्नस लॅब्युशेन ८९२ पाॅइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच स्टीव स्मिथ ८४५ पाॅइंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. उस्मान ख्वाजा ७ व्या, तर हेड ९ व्या क्रमांकावर आहे.
भारतीय फलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास विराट आणि रोहित टॉप १० मध्ये आहेत. तसेच रिषभ पंत ११ व्या क्रमांकावर आहे. मयंक अगरवाल २० व्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल क्रमांकावर आहे. या यादीत अश्विन दुसऱ्या, तर कगिसो रबाडा तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे आयपीएलच्या मैदानावर हे काय घडलं; विकेट काढल्यानंतर पत्नीला फ्लाईंग किस करताना दिसला खेळाडू
‘पंजाबी तडका अन् कॅरेबियन मस्ती!’, शिखर धवनने विंडीज खेळाडूंसह धरला ठेका, Video व्हायरल