महिला क्रिकेट विश्वातून मोठी बातमी येत आहे. आयसीसीने मंगळवारी (१५ डिसेंबर) महिला टी२० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत एकूण ३१ सामने होणार आहेत. यातील पहिला सामना ४ मार्च, २०२२ ला वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हमध्ये होणार आहे, तर अंतिम सामना ३ एप्रिल रोजी न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथील हेगले ओव्हल मैदानावर होणार आहे.
आयसीसीने आपल्या अहवालात म्हटले की, “महिलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ४ मार्च ते ३ एप्रिल २०२२ दरम्यान ३१ सामने खेळवण्यात येणार आहेत. ऑस्ट्रेलियात महिलांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर खेळल्या जाणार्या पहिल्या जागतिक महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मूळ वेळापत्रक फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये स्थगित करण्यात आली होती. तीच सहा यजमान शहरे आणि ठिकाणे २०२२ साठी राखून ठेवली गेली आहेत.”
It's here 🗓️
Which clash are you most looking forward to?#WWC22 pic.twitter.com/HcKdxzaEbG
— ICC (@ICC) December 15, 2020
The ICC Women's Cricket World Cup will see 31 matches played across 31 action-packed days between 4 March and 3 April 2022 🙌
Full schedule 🗓️ ⬇️ #WWC22 https://t.co/V3Bvy00wGO
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) December 15, 2020
भारतीय महिला संघाबाबत बोलायचं झालं, तर भारतीय संघ साखळी फेरीत ७ सामने खेळेल. यातील चार सामने न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघाविरुद्ध खेळले जातील. तसेच उर्वरित ३ सामने हे नंतर पात्र ठरलेल्या संघांविरुद्ध खेळले जातील.
असे असेल वेळापत्रक आणि ठिकाण
दिवस- रात्र सामने (*)
बे ओव्हल, टॉरंगा
०४ मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर*
०६ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध भारत*
०८ मार्च, २०२२- ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर*
११ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध दक्षिण आफ्रिका*
१४ मार्च, २०२२- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड*
१६ मार्च, २०२२- इंग्लंड विरुद्ध भारत*
१८ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध क्वालिफायर
युनिव्हर्सिटी ओव्हल, डुनेडिन
०५ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध दक्षिण आफ्रिका
०७ मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर
०९ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध इंग्लंड
सेडन पार्क, हॅमिल्टन
०५ मार्च, २०२२- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड*
१० मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध भारत*
१२ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध भारत*
१४ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध क्वालिफायर
१७ मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका*
२१ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध क्वालिफायर*
२२ मार्च, २०२२- भारत विरुद्ध क्वालिफायर*
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
१३ मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१५ मार्च, २०२२- ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर
२२ मार्च, २०२२- दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२४ मार्च, २०२२- दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर
२५ मार्च, २०२२- क्वालिफायर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२७ मार्च, २०२२- इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर
३० मार्च, २०२२- उपांत्य सामना-१
इडन पार्क, ऑकलँड
१९ मार्च, २०२२- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया*
२० मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड
हेगले ओव्हल, ख्राईस्टचर्च
२४ मार्च, २०२२- इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर*
२६ मार्च, २०२२- न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर
२७ मार्च, २०२२- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका*
३१ मार्च, २०२२- उपांत्य सामना-२
०३ एप्रिल, २०२२- अंतिम सामना*
महत्त्वाच्या बातम्या-
T20 World Cup 2022: १५ जागांसाठी भिडणार ८६ संघ; ‘हे’ तीन संघ उतरणार पहिल्यांदाच मैदानात
अफलातून! सिडनीच्या ‘या’ फलंदाजाने ठोकल्या २५ चेंडूत ६५ धावा; ७ षटकारांचाही समावेश
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडची झेप; भारताची वाट झाली अवघड