भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि सध्या विश्वचषक 2023 स्पर्धेत समालोचनाची भूमिका पार पाडत असलेला गौतम गंभीर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गंभीर नेहमीच असे काही बोलतो, ज्यामुळे त्याची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. गंभीरने अनेकदा 2011 विश्वचषक विजेता कर्णधार एमएस धोनी याला श्रेय देण्यावरून त्याच्यावर निशाणा साधला आहे. अशात विश्वचषक 2023मध्येही त्याने जोस बटलर याच्याविषयी विधान करत नाव घेता धोनीवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाला गौतम गंभीर?
गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत इंग्लंड संघाच्या पराभवाच्या हॅट्रिकनंतर मोठे विधान केले. त्याने म्हटले की, संघाला मिळालेल्या पराभवासाठी जोस बटलर (Jos Buttler) याला जबाबदार ठरवणे योग्य नाहीये. गंभीरनुसार, बटलर एकटा विश्वचषक जिंकून देऊ शकत नाही. जर तो एकटा विश्वचषक जिंकू शकला असता, तर त्याने आतापर्यंत इंग्लंडला विश्वचषक जिंकून दिला असता.
इंग्लंड संघ विश्वचषक 2023मध्ये गतविजेता म्हणून उतरला होता, पण त्यांचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. संघाला आतापर्यंत 5 पैकी 4 सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
‘एकटा बटलर विश्वचषक जिंकू शकत नाही’
खराब प्रदर्शनामुळे बटलरवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मात्र, गंभीरच्या मते, संघाच्या या लाजीरवाण्या प्रदर्शनासाठी फक्त बटलर नाही, तर संपूर्ण संघ जबाबदार आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीर म्हणाला, “जर कर्णधारच एकटा विश्वचषक जिंकून देऊ शकतो, तर जोस बटलर तुम्हाला हा विश्वचषक जिंकून देऊ शकला असता. बटलर या विश्वचषकात तुम्हाला जिंकून देऊ शकला नाही. कारण, फलंदाजांनी धावा केल्या नाहीत आणि गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या नाहीत. जर स्पर्धा जिंकण्याचे श्रेय फक्त एका खेळाडूला दिले जाईल, तर इतर 14 खेळाडूंचे काय होणार. जर कर्णधारच विश्वचषक जिंकून देऊ शकला असता, तर जोस बटलर एक वर्षापूर्वी चांगला नव्हता आणि एक वर्षानंतर इतका खराब नाहीये. त्यामुळे कुठे ना कुठे समतोल राखणे गरजेचे आहे.”
ट्रोल झाला गंभीर
या विधानामुळे गंभीरवर नेटकऱ्यांनी टीकास्त्र सोडले आहे. अनेक युजर्सला ही प्रतिक्रिया आवडली नाहीये. एकाने म्हटले की, “गौतम गंभीरकडे फलंदाज म्हणून चांगला फुटवर्क होता, पण तो पुढे जाऊ शकला नाही.”
Gautam Gambhir had fantastic footwork as a batsman but he is not able to move on.
#gautamgambhir @GautamGambhir #SLvsENG #MSDhoni𓃵 pic.twitter.com/I1DXJseeFM— Public View (@HarishMand49205) October 27, 2023
आणखी एकाने म्हटले की, “गंभीर नेहमीच त्याचा विचार करतो.”
Gambhir always thinking about it. pic.twitter.com/MEyQIy7Th1
— Ashish Sharma (@ahamashish) October 27, 2023
खरं तर, इंग्लंड संघाने श्रीलंकेविरुद्ध 8 विकेट्सने पराभव पत्करला. इंग्लंडचा हा पाच सामन्यातील चौथा पराभव आहे. या पराभवामुळे ते पॉईंट्स टेबलमध्ये 9व्या स्थानी आहेत. (icc world cup 2023 former cricketer gautam gambhir says jos buttler can not win the world cup alone)
हेही वाचा-
IND vs ENG: फलंदाजांची बॅट तळपणार की, गोलंदाज उडवणार दांड्या? लखनऊमध्ये हारायचाच नाही टॉस, वाचलंच पाहिजे
टॉस जिंकत पााकिस्तानने घेतली बॅटिंग, दोघांना डच्चू, आफ्रिका संघात बावुमाचे पुनरागमन, तब्बल ‘एवढे’ बदल