---Advertisement---

IPL 2023 । सचिनने मुंबई इंडियन्सची साथ सोडली? समोर आली महत्वाची माहिती

Sachin Tendulkar
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने हार्दिक पंड्या याला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. मागच्या हंगामापर्यंत रोहित शर्मा याने मुंबईच्या कर्णधाराची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडली होती. पण आगामी हंगामात त्याला संघाचे नेतृत्व करता येत नाही. याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सचा मेंटॉर सचिन तेंडुलकर याच्याविषयी महत्वाची माहिती समोर येत आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद काढून घेतले गेले. या निर्णयानंतर मुंबई इंडियन्स फ्रँचायझी आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) चाहत्यांच्या निशाण्यावर आले. सोशल मीडियावर या मुद्यामुळे वातावरण गरम असतानाच सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्याविषयी एक चुकीची माहिती मसोर आली. सचिन तेंडुलकर मागच्या काही आयपीएल हंगामांपासून मुंबई इंडियन्सच्या मेंटॉरची भूमिका पार पाडत आहे. पण रोहितकडून कर्णधारपद काढून घेतल्यानंतर सचिनने देखील संघाचे मेंटॉरपद सोडले, अशा बातम्या समोर आल्या.

पण ताज्या माहितीनुसार सचिनबाबत समोर आलेल्या या बातम्या चुकीच्या आणि खोट्या आहेत. सचिन मुंबई संघाच्या मेंटॉरपदी कायम असल्याची माहिती विश्वसणीय सुत्रांकडून मिळाली आहे. अशात सचिनबाबत चुकीच्या बातम्यांना एकप्रकारे पूर्णविराम लागताना दिसत आहे.

नव्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार झालेला हार्दिक पंड्या मुळचा याच संघाचा खेळाडू आहे. त्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण केले. पुढे हार्दिकला भारतीय संघात देखील संधी मिळाली. आयपीएल 2022 पूर्वी मात्र मुंबईने हार्दिकला रिलीज केले. मेला लिलावात गुजरात टायटन्सने 15 कोटी रुपयांमध्ये हार्दिक पंड्याला खरेदी केले. कर्णधार म्हणून पहिल्याच आयपीएल हंगामात हार्दिकने गुजरातसाठी ट्रॉफी जिंकली आणि आपली गुणवत्ता सिद्ध केली.

आयपीएल 2023 मध्येही हार्दिकने गुजरात उपविजेता संघ बनवले. पण आयपीएल 2024 पूर्वी अष्टपैलूची घरवापसी झाली. मुंबईने हार्दिकला 15 कोटी रुपयांमध्ये गुजरातकडून ट्रेड केले आणि संघाचा कर्णधार देखील बनवले. रोहित शर्माच्या नेतृत्वात पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्स संघ आगामी हंगामात हार्दिकच्या नेतृत्वात खेळेल. चाहत्यांना मात्र हा निर्णय पटला नाही, असेच दिसते. आता प्रत्यक्षात कर्णधार म्हणून हार्दिकच्या प्रदर्शनावर सर्वांची नरज असेल. (Important news about Mumbai Indians mentor Sachin Tendulkar)

महत्वाच्या बातम्या – 
टॅक्सी ड्रायव्हर ते कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त पदार्पण, आमिर जमालचा प्रेरणादायी प्रवास
IPL 2024 । मुंबई इंडियन्ससह ‘हे’ चार संघांचे कर्णधार बदलणार, पाहा सर्व 10 कर्णधारांची यादी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---