आयपीएल 2020 च्या यशस्वी आयोजनानंतर आता सर्वांच्या नजरा पुढील वर्षीच्या आयपीएल हंगामाकडे लागतील. पुढील हंगामापूर्वी मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. बर्याच संघांचे दिग्गज खेळाडू या लिलावात येऊ शकतात. मेगा लिलावापूर्वी संघांकडे त्यांचे काही खेळाडू कायम ठेवण्याची संधी आहे.
लिलाव होण्यापूर्वी संघ तीन खेळाडू कायम ठेवू शकतो आणि लिलावा दरम्यान 2 खेळाडूंना राईट टू मॅच कार्डच्या माध्यमातून राखून ठेवता येईल. अशा परिस्थितीत संघांना फक्त 5 खेळाडू परत मिळवण्याची संधी असणार आहे. आता लिलावात कोणता संघ चांगल्या खेळाडूंची निवड करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सर्व संघ मेगा लिलावात प्रमुख खेळाडू निवडण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत, एखाद्या खेळाडूसाठी बोली लावण्यासाठी संघांमध्ये बराच वेळ संघर्ष असतो. खेळाडूची मागणी जितकी जास्त असेल तितकीच संघांमधील बोली अधिक असेल. अशा परिस्थितीत खेळाडूंना त्यांच्या मूळ किंमतीपेक्षा अधिक पैसे मिळण्याची संधी असते. यावेळी, बरीच मोठी नावे मेगा लिलावात सामील होऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांच्यावर मोठी बोली लागणे स्वाभाविक आहे.
मिचेल स्टार्क
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पुढच्या वर्षी होणारा टी-20 विश्वचषक लक्षात घेऊन टी-20 लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच तो 6 वर्षांनंतर बिग बॅश लीगमध्ये परतणार आहे. गेल्या वर्षी स्टार्कने आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. स्टार्कसारख्या वेगवान गोलंदाजाला कोणताही संघ संघात घेण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा परिस्थितीत जर स्टार्क लिलावात आला, तर आपण त्यावर मेगा लिलावात कोट्यावधी रुपयांची बोली लागताना पाहू शकतो.
सुरेश रैना
आयपीएलमधील सुरेश रैनाचे नाव त्याच्या कामगिरीमुळे मोठे आहे. रैनाला उत्कृष्ट कामगिरीमुळे ‘मिस्टर आयपीएल’ देखील म्हणतात. आयपीएल सुरू होण्यापूर्वी रैना वैयक्तिक कारणास्तव यंदा युएईहून भारतात परतला होता. रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे.
रैनाचा चेन्नई बरोबर 3 वर्षाचा करार होता जो या हंगामाच्या शेवटी संपला आहे. अशा परिस्थितीत चेन्नईने कराराची मुदतवाढ न केल्यास मेगा लिलावात रैनाला विकत घेण्यासाठी इतर संघांमध्ये स्पर्धा होऊ शकते. आयपीएलमध्ये रैनाने 193 सामन्यांत 5368 धावा केल्या आहेत.
इशान किशन
मुंबई इंडियन्सच्या इशान किशनने आपल्या फलंदाजीने सलामी आणि मध्य क्रमवारीत मुंबईकडून जबरदस्त फलंदाजी केली. संघांना फक्त 5 खेळाडू (2 आरटीएम कार्ड) राखण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत जर मुंबई संघाने रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव यांना कायम ठेवले, तर या युवा फलंदाजाला मेगा लिलावात सामील व्हावे लागेल.
जर मुंबईला हा खेळाडू परत मिळवायचा असेल, तर इतर संघांसह बोली लावण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल. अशा परिस्थितीत इशान किशन लिलावात देखील सर्वात महागडा खेळाडू म्हणून विकला जाऊ शकतो.
ट्रेंडिंग लेख-
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! युएईत आयपीएल भरवणे बीसीसीआयला पडले महागात; चुकवावी लागली मोठी किंमत
काय सांगता! पुण्याचा संघ आयपीएलमध्ये येणार परत?