मंगळवारी (दि. ३ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात आयपीएल २०२२मधील ४८वा सामना पार पडला. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात पंजाबने ८ विकेट्सने गुजरातला धूळ चारली. या विजयासह पंजाबला गुणतालिकेत मोठा फायदा झाला. विशेष म्हणजे, अष्टपैलू लियाम लिविंगस्टोनच्या जोरदार फटकेबाजीमुळे पंजाबला हा सामन्या अवघ्या सोळाव्या षटकातच जिंकता आला. लिविंगस्टोनने सोळाव्या षटकात जी काही फटकेबाजी केली, त्यामुळे त्याच्या नावावर खास विक्रम रचला गेला आहे.
झाले असे की, गुजरात संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत १४३ धावा केल्या होत्या. गुजरातच्या १४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने सहजरीत्या हे आव्हान १६व्या षटकात पूर्ण केले. खरं तर पंजाबला शेवटच्या ५ षटकात विजयासाठी फक्त २७ धावांची आवश्यकता होती.
𝐋𝐨𝐧𝐠𝐞𝐬𝐭 𝐬𝐢𝐱 𝐨𝐟 #𝐈𝐏𝐋𝟐𝟎𝟐𝟐 𝐛𝐞𝐥𝐨𝐧𝐠𝐬 𝐭𝐨 – 𝐋𝐢𝐚𝐦 𝐋𝐢𝐯𝐢𝐧𝐠𝐬𝐭𝐨𝐧𝐞! 🔥💥#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #GTvPBKS #ਸਾਡਾਪੰਜਾਬ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 3, 2022
यावेळी पंजाबकडून सोळाव्या षटकात खेळपट्टीवर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) होते. लिविंगस्टोन स्ट्राईकवर होता. तसेच, गुजरातकडून गोलंदाजी करण्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आला होता. शमीने पहिला चेंडू जसा टाकला, तसा लिविंगस्टोनने ११७ मीटरचा गगनचुंबी षटकार खेचला. हा आयपीएल २०२२मधील सर्वात लांब षटकार होता. त्यानंतर त्याने पुढच्या दोन्ही चेंडूंवर षटकार मारला. तसेच, चौथ्या चेंडूवर चौकार मारला. पुढे पाचव्या चेंडूवर २ धाव घेतल्या आणि पुन्हा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. यानंतर पुन्हा लिविंगस्टोनने चौकार मारला. त्याने शमीच्या षटकात एकूण २८ धावा कुटल्या. यामुळे तो एका षटकात सर्वाधिक धावा करणारा संयुक्तरीत्या दुसरा फलंदाज बनला.
𝙏𝙪 𝙟𝙝𝙖𝙡𝙡𝙖 𝙨𝙖𝙖𝙧𝙖 𝙜𝙖𝙣𝙜 𝙠𝙖𝙧𝙩𝙖 𝙤 𝙝𝙤
𝙉𝙞 𝙠𝙖𝙡𝙡𝙖 𝙠𝙖𝙡𝙡𝙖 𝙝𝙖𝙣𝙜 𝙠𝙖𝙧𝙩𝙖 𝙖𝙖𝙮𝙚 𝙝𝙖𝙮𝙚… 😍#SaddaPunjab #PunjabKings #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #GTvPBKS @liaml4893 pic.twitter.com/sserXgw7Zv— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 3, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आयपीएल २०२२मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी पॅट कमिन्स आहे. त्याने डॅनियल सॅम्सविरुद्ध एका षटकात ३४ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या स्थानी आता लिविंगस्टोन आला आहे. तो दिनेश कार्तिक आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्यासह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहे. कार्तिकने मुस्तफिजुर रहमानविरुद्ध २८ धावा चोपल्या होत्या, तर ब्रेविसने राहुल चाहरविरुद्ध २८ धावांचा पाऊस पाडला होता. दुसरीकडे, तिसऱ्या स्थानी जोस बटलर आहे. बटलरने बेसिल थंपीविरुद्ध एका षटकात २६ धावांची बरसात केली होती.
आयपीएल २०२२मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
३४ धावा- पॅट कमिन्स (विरुद्ध डॅनियल सॅम्स)
२८ धावा- लियाम लिविंगस्टोन (विरुद्ध मोहम्मद शमी)*
२८ धावा- दिनेश कार्तिक (विरुद्ध मुस्तफिजूर रहमान)
२८ धावा- डेवाल्ड ब्रेविस (विरुद्ध राहुल चाहर)
२६ धावा- जोस बटलर विरुद्ध बेसिल थंपी
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरातच्या ‘टायटन्स’वर भारी पडले पंजाबचे ‘किंग्स’, ८ विकेट्सने टेबल टॉपरला चारली धूळ
‘दोघेही मोठे ब्रँड’, पीटरसनने ‘या’ कारणामुळे रोनाल्डोशी केली विराटची तुलना, जाणून घ्या कारण