इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 चा आज (रविवार, दिनांक 28 मे) रोजी अंतिम सामना आहे. चार वेळचा विजेता संघ अर्थात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गत वर्षीचा विजेता संघ गुजरात टायटन्स यांच्यात आज फायनल रंगणार आहे. परंतू आयपीएलचा हा संपूर्ण हंगात अत्यंत चांगला प्रेक्षणीय राहिला आहे. मैदानावर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी केलेली बैठक व्यवस्था ते घरी सामना पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी दर्जेदार व्हिज्युअल्स असा सर्वच बाजूंही ही स्पर्धा प्रेक्षणिय राहिला. परंतू, या सगळ्यात ही स्पर्धा अधिक लक्षणीय आणि प्रेक्षणीय करण्यात मोलाचा वाटा जर कुणाचा राहिला असेल तर तो म्हणजे प्रोडक्शन टीमचा.
All the action, drama, emotion which is set to get captured by more than 50 different cameras across the stadium ????
Mr. Dev Shriyan, Director – Production and Broadcast breaks down the coverage of the Final Showdown for us????????????????#TATAIPL | #CSKvGT | #Final pic.twitter.com/pankEr6VHz
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2023
इंडियन प्रीमियर लीगचे जगभरात चाहते आणि प्रेक्षक आहे. घरबसल्या मोबाईल टीव्हीवर आयपीएल पाहणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. त्यामुळे या स्पर्धेचे प्रक्षेपण हे अतिउच्च दर्जाचे करण्यासाठी तसेच ही स्पर्धा अधिक विश्वासार्ह करण्यासाठी मैदानावर एक दोन नाही तर तब्बल 50 हून अधिक कॅमेरे प्रत्येक सामन्यावेळी बसवण्यात आले होते, अशी माहिती समोर येत आहे. यासंदर्भात आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्यातून आपल्याला समजतं की हे कॅमेरे पंचांच्या टोपीपासून ते स्टम्प, स्टेडियमचे छत, सीमारेषा अशा अनेक ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले होते. ( in ipl match more than 50 different cameras across stadium read in details )
रविवारी (दिनांक 28 मे) रोजी आयपीएलच्या 16व्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबादेतील श्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असणारे हे मैदान एक आश्चर्यच आहे. येथील प्रकाशझोत, बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, संघांसाठीची दालने आदी गोष्टी या सर्वांनाच अचंबित करणारी आहेत. तसेच आता 50 कॅमेरांमुळे हा सामना अधिक प्रेक्षणीय होणार आहे. तब्बल 1 लाखाहून अधिक प्रेक्षक हे चेन्नई आणि गुजरात यांच्यातील हंगामाची फायनल लढत पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
अधिक वाचा –
– महाराष्ट्र प्रिमीयर लीगमधील सहभागावरून ऋतुराजवर टीकेची झोड, चाहते म्हणतायेत, “तू आता…”
– ‘ते दोघे मित्रांसारखे…’, गावसकरांना हार्दिक पंड्यामध्ये दिसली धोनीची झलक, वाचा सविस्तर