पुणे, दि.15 जानेवारी 2023: गुरू तेगबहादुर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित 21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत खुल्या गटात खडकी युनायटेड संघाने तर प्रौढ गटात पुणे मास्टर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
सीओईपी फुटबॉल मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत खुल्या गटात खडकी युनायटेड संघाने सडनडेथमध्ये अमर एफसी संघाचा 6-5 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकरमध्ये सामना खेळविण्यात आला. टायब्रेकरमध्ये खडकी युनायटेड संघाकडून अतुल रामास्वामी, जयंत निंबाळकर, एलन रघुवेलू, रियान यादगिर यांनी तर, अमर एफसीकडून यश पवार, फ्रेडी रॉड्रिक्स, गौरव स्वामिनाथन, राज जाधव यांनी गोल केले. टायब्रेकरमध्ये देखील सामना बरोबरीत सुटल्यामुळे सडनडेथमध्ये सामना खेळविण्यात आला. सडनडेथमध्ये खडकी युनायटेडकडून साम्युअल हस्ता, डू एल यांनी गोल करुन संघाला विजय मिळवून दिला.अमर एफसीकडून आशुतोष यादवला गोल मारण्यात अपयश आले.
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत अजय जाधव(28, 45मि.) याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर बगिरा एफसी संघाने क्रिसेंट एफसीचा 3-0 असा सहज पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
प्रौढ गटात अंतिम फेरीत पुणे मास्टर्स संघाने आकतसुखी एफसी संघाचा सडनडेथमध्ये 7-6 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. निर्धारित वेळेत पुणे मास्टर्सकडून जुनेद अक्कलकोटकर याने तर आकतसुखी कडून शनुप नायर यांनी प्रत्येकी एक गोल केला व त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. बरोबरीत सुटल्यामुळे सामना टायब्रेकरमध्ये खेळविण्यात आला. टायब्रेकरमध्ये पुणे मास्टर्सकडून जुनेद अक्कलकोटकर, ऋषी भागवत, फारुख शेख, जय पिल्ले यांनी तर, आकतसुखी एफसी कडून प्रशांत ससाणे, विजय अर्नाल्ड, विवेक रोकडे, शनुप नायर यांनी गोल केले. पण टायब्रेकरमध्ये देखील बरोबरी झाल्यामुळे सडनडेथमध्ये खेळविण्यात आला. सडनडेथमध्ये विजयी संघाकडून सतीश पटेल, रीतपाल सिंग यांनी गोल केले. आकतसुखी एफसीकडून डेलझाद एम याला गोल मारण्यात अपयश आले.
स्पर्धेतील खुल्या गटातील विजेत्या खडकी युनायटेड संघाला गोल्ड करंडक व 25000रूपये, तर उपविजेत्या अमर एफसी संघाला करंडक व 15000रूपये अशी पारितोषिके देण्यात आली.याशिवाय तिसऱ्या क्रमांकासाठी 10000रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.
वरिष्ठ गटातील विजेत्या पुणे मास्टर्स संघाला करंडक व 10000रूपये तर उपविजेत्या आकतसुखी एफसी संघाला करंडक व 5000रूपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण पुणे विद्यापीठचे क्रिडा संचालक डॉ दिपक माने, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल अभय शास्त्री, नगरसेवक धनंजय जाधव, गुरू तेगबहादुर फाऊंडेशनचे अध्यक्ष एस. एस. अहलुवालिया, रजिंदर सिंग वालिया, रानी अहलुवालिया, लायन्स क्लब पुणे कोथरूडचे अध्यक्ष रवींद्र भोसले, राजवीर सिंग घई, एलएस नारंग, विठ्ठल कुटे, इंद्रजीत सिंग चावला, जीवनीत सिंग चावला, लायन केतन शिंदे, सोहन सिंग सोनू, गुनेश साने, नितीन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: खुला गट:
खडकी युनायटेड: 4(अतुल रामास्वामी, जयंत निंबाळकर, एलन रघुवेलू, रियान यादगिर)(गोल चुकवले -: मिथुन थापा) टायब्रेकरमध्ये बरोबरी वि.अमर एफसी: 4(यश पवार, फ्रेडी रॉड्रिक्स, गौरव स्वामिनाथन, राज जाधव)(गोल चुकवले -: सरन मोंटेरो); पुर्ण वेळ:- 0-0; टायब्रेकरमध्ये बरोबरी:- 4-4;
खडकी युनायटेड: 2(साम्युअल हस्ता, डू एल ) सडनडेथमध्ये वि. वि.अमर एफसी: 1 (ईशान वर्मा)(गोल चुकवले:-आशुतोष यादव);
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी:
बगिरा एफसी: 3(अजय जाधव 28मि.(पास – सुधीर कुमार), अजय जाधव 45मि.(पास – नीरज भट), आदित्य सिंग 55मि.(पास – हेमंत रावत)) वि.वि.क्रिसेंट एफसी: 0;
प्रौढ गट: अंतिम फेरी:
पुणे मास्टर्स: 5(जुनेद अक्कलकोटकर 10मि.(पास – रवी रावत), जुनेद अक्कलकोटकर, ऋषी भागवत, फारुख शेख, जय पिल्ले)(गोल चुकविले:- प्रणील जाधव) टायब्रेकमध्ये बरोबरी वि.आकतसुखी एफसी: 5(शनुप नायर 35मि.(पेनल्टी), प्रशांत ससाणे, विजय अर्नाल्ड, विवेक रोकडे, शनुप नायर)(गोल चुकविले:- केनथ फर्नांडिस); पुर्ण वेळ: 1-1; 4-4;
पुणे मास्टर्स: 2(सतीश पटेल, रीतपाल सिंग) सडनडेथमध्ये वि.वि.आकतसुखी एफसी: 1(अभिजीत शिंदे)(गोल चुकविले :- डेलझाद एम).
इतर पारितोषिके: खुला गट:
सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक: मुथून थापा;
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक: संस्कार सांघवी;
सर्वोत्कृष्ट खेळाडू: गौरव स्वामिनाथन;
वरिष्ठ गट:
सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक: रीतपाल सिंग;
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक: अभिजीत देशपांडे;
सर्वोत्कृष्ट खेळाडू: प्रशांत ससाणे.
(In the 21st Guru Teg Bahadur Gold Cup football tournament, Khadki United won the open category, Pune Masters won the adult category.)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पराभवानंतर श्रीलंकन कर्णधार आणि प्रशिक्षकांचे वाढले टेंशन! क्रिकेट बोर्डाने विचारले एवढ्या मोठ्या पराभवाचे कारण
“विराट-रोहितनंतर सूर्याच तिन्ही फॉरमॅटचा फलंदाज”, माजी कर्णधाराने उधळली स्तुतीसुमने