भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर रंगला आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ सर्वबाद झाला. भारताने न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 107 धावांचं आव्हान दिलं आहे. तत्पूर्वी भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) 99 धावांची शानदार खेळी करून बाद झाला, पण 1 धावेमुळे त्याचे शतक अपूर्ण राहिले. पण फलंदाजीदरम्यान पंतने 107 मीटर लांब गगनचुंबी षटकार ठोकला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रिषभ पंत (Rishabh Pant) 90 धावांवर फलंदाजी करत असताना टीम साऊथीने 87व्या षटकातील तिसरा चेंडू टाकला. या चेंडूवर पंतने 107 मीटर लांबीचा गगनचुंबी षटकार ठोकला. पंतने 107 मीटर लांब ठोकलेला षटकार थेट मैदानाबाहेरच गेला. त्याने मारलेला हा फटका इतका जबरदस्त होता की, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांपासून मैदानात उपस्थित सर्व चाहते थक्क झाले. हा खणखणीत षटकार पाहून न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) आश्चर्य व्यक्त केले.
𝗢𝘂𝘁 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗣𝗮𝗿𝗸! 😍
Rishabh Pant smacks a 1⃣0⃣7⃣m MAXIMUM! 💥
Live – https://t.co/FS97Llv5uq#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/4UHngQLh47
— BCCI (@BCCI) October 19, 2024
पण निराशाजनक गोष्ट म्हणजे रिषभ पंत (Rishabh Pant) 99 धावांवर बाद होताच नको असलेल्या यादीत सामील झाला. कसोटी क्रिकेटमध्ये 99 धावांवर बाद झालेल्या खेळाडूंसोबत त्याचा समावेश झाला आहे. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या पंतने 105 चेंडूंत 18 चौकारांसह, 3 षटकारांच्या मदतीने 99 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये 99 धावा करून बाद झालेल्या भारतीय फलंदाजांच्या यादीत पंत, एमएस धोनी, सौरव गांगुली यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; खराब खेळीनंतर ‘या’ स्टार खेळाडूवर चाहते भडकले, बाहेर काढण्याची केली मागणी!
नव्या चेंडूनं केला टीम इंडियाचा गेम! न्यूझीलंडनं असा पलटवला सामना…
खेळ थांबवल्यामुळे अंपायर्सवर भडकला रोहित शर्मा, चिन्नास्वामी मैदानावर मोठा गोंधळ