आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दोन नवीन फ्रेंचायझी सामील होणार आहेत. तत्पूर्वी पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात मेगा लिलावाचे आयोजन केले जाणार आहे. मेगा लिलावासाठी सर्व फ्रेंचायझींनी अनेक दिग्गज खेळाडू उपस्थित करून दिले आहेत. फ्रेंचायझींना पुढच्या हंगामासाठी संघात फक्त चार खेळाडू कायम ठेवले आहेत आणि इतर सर्व खेळाडूंना रिलीज केले आहे. याच पार्श्वभूमीवर मेगा लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंवर बोली लागताना दिसणार आहे.
मेगा लिलावात काही खेळाडू असेही दिसतील, ज्यांनी आयपीएलच्या २०२१ हंगामात निराशाजनक प्रदर्शन केले आहे, पण तरीही त्यांच्यावर मोठी बोली लागेल. या खेळाडूंकडे असलेला अनुभव आणि चांगले प्रदर्शन करण्याची क्षमता हे यामागचे मुख्य कारण असणार आहे. २०२१ हंगामात हार्दिक पंड्या, ओएन मॉर्गन, स्टीव स्मिथ, दिनेश कार्तिक आणि सुरेश रैना या खेळाडूंनी खूपच खराब प्रदर्शन केल आहे. परंतु तरीदेखील मेगा लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपण या लेखात याच खेळाडूंची माहिती घेणार आहोत.
१. ओएन मॉर्गन (Eoin Morgan) –
कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार ओएन मॉर्गनसाठी आयपीएलचा २०२१ हंगाम खूपच निराशाजनक राहिला. त्याने यावर्षी खेळलेल्या १७ आयपीएल सामन्यांमध्ये फक्त १३३ धावा केल्या. परंतु त्याने केकेआर संघाचे कर्णधारपद चांगल्या प्रकारे भूषविले. त्याच्या नेतृत्वात केकेआर संघ यावर्षी आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. मॉर्गनची यावर्षी आयपीएलमधीक सर्वाधिक धावासंख्या ४७ होती आणि त्याची सरासरी ११ होती. असे असले तरी, मॉर्गन एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि पुढच्या हंगामात अशा काही फ्रेंचायझी आहेत, ज्या मॉर्गनला त्यांच्या संघात सामील करू इच्छित असतील. मेगा लिलावात मॉर्गनवर मोठी बोली लावली जाऊ शकते.
२. दिनेश कार्तिक (Dinesh karthik) –
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकला पुढच्या हंगामात खेळण्यासाठी मोठी रक्कम मिळू शकते. कार्तिक एक चांगला यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे. परंतु, आयपीएल २०२१ मध्ये तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये खेळलेल्या १७ सामन्यांमध्ये २२३ धावा केल्या आहेत आणि यादरम्यान त्याची सरासरी २२.३ होती. यावर्षी कार्तिकला आयपीएलमध्ये एक अर्थशतक देखील करता आले नव्हते.
३. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) –
भारताचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मागच्या काही वर्षांपासून दुखापतीशी आणि खराब फॉर्मशी झगडत आहे. आयपीएल २०२१ मध्ये देखील तो दुखापतीशी झुंज देत होता. यावर्षी त्याने आयपीएलमध्ये सहभाग घेतला, पण गोलंदाजी करण्यात तो अपयशी ठरला. तर फलंदाजीतही तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्याने यावर्षी खेळलेल्या १२ आयपीएल सामन्यांमध्ये १२७ धावा केल्या आणि यादरम्यान त्याची सरासरी १४.११ होती. आयपीएलनंतर खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकात देखील तो चांगले प्रदर्शन करू शकला नाही. असे असले तरी, तो टी२० मधील एक खतरनाक खेळाडू आहे आणि मेगा लिलावात संघ त्याच्यावर मोठी बोली लावू शकतात.
४. सुरेश रैना (suresh raina) –
भारताचा माजी दिग्गज खेळाडू सुरेश रैना आयपीएलमध्ये अजूनही खेळत आहे. त्याने आयपीएलमध्ये अनेकदा महत्वपूर्ण खेळी करून दाखवली आहे. परंतु २०२१ हंगामात त्याला अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. यावर्षी त्याने आयपीएलमध्ये १२ सामने खेळले आणि यामध्ये १७.७७ च्या सरासरीने १६० धावा केल्या. चेन्नई संघाने त्याला पुढच्या वर्षीसाठी संघात कायम ठेवले नसून, त्याच्या जागी ऋतुराज गायकवाड याला संधी दिली आहे. असे असले तरी, रैनाची आयपीएल कारकीर्द मोठी आहे आणि आतापर्यंत या स्पर्धेत ५५०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, चेन्नई सुपर किंग्स मेगा लिलावात मोठी बोली लावून त्याला पुन्हा संघात सामील करू शकतो.
५. स्टीव स्मिथ (steve smith) –
ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ आयपीएल २०२१ मध्ये चांगले प्रदर्शन करू शकला नव्हता. यावर्षी आयपीएलमध्ये त्याने अवघ्या २५.३३ च्या सरासरीने १५२ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने अजिंक्य रहाणेच्या आधी त्याला खेळण्याची संधी दिली. परंतु स्मिथ त्याचा फायदा घेऊ शकला नाही. त्याने आतापर्यंत १०३ आयपीएल सामने खेळले आहेत आणि २५०० धावा केल्या आहेत. त्याचा अनुभव पाहता पुढच्या हंगामात स्मिथला संघात सामील करण्याचा अनेक फ्रेंचायझींचा प्रयत्न असेल. फ्रेंचायझी त्याला संघात सामील करण्यासाठी मोठी किंमत मोजू शकतात.
महत्वाच्या बातम्या –
विराट विरुद्ध गांगुली वादाचे पडसाद सोशल मीडियावरही, #WorldStandsWithKohli हॅशटॅग ट्रेंड
तब्बल ५०५ मिनिटे फलंदाजी अन् ९९ धावांवर बाद, वाचा गावसकरांच्या ‘हिरो’च्या खेळीबद्दल सविस्तर
हरभजनच्या गोलंदाजीवर अमिताभ बच्चन यांची फटकेबाजी अन् इरफानची कॉमेंट्री, व्हिडिओ व्हायरल