---Advertisement---

मम्मीज फाउंडेशन जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत संघर्ष क्रीडा मंडळ व सत्यम सेवा संघांची बाजी.

On: सोमवार, डिसेंबर 2, 2019 1:52 PM
---Advertisement---
मम्मीज फाउंडेशन आणि श्री महाराष्ट्र मंडळ भांडुप यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं होतं लोकप्रिय कामगार नेते मा. आमदार स्व. दीना बामा पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते. महिला गटात संघर्ष क्रीडा मंडळ तर पुरुष गटात सत्यय सेवा संघाने विजेतेपद पटाकवले.

 

माँ साहेब मीनाताई ठाकरे उद्यान, कोकण नगर, जे. एम. रोड भांडुप पश्चिम येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महिला गटाच्या अंतिम फेरीत महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ यांच्यात लढत झाली. संघर्ष क्रीडा मंडळाने १८-०९ अशी भक्कम आघाडी मध्यांतरापर्यत घेतली होती. तीच आघाडी कायम ठेवत ३१-२२ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. भक्ती इंदुलकर, पूजा जाधव यांनी चांगला खेळ केला.

 

पुरुष गटात सत्यम सेवा संघ विरुद्ध केदारनाथ क्रीडा मंडळ यांची लढत झाली. ४४- २६ असा एकतर्फी विजय मिळवत सत्यम सेवा संघाने विजेतेपद पटाकवले. मध्यंतरापर्यत २४-१७ अशी बरयापैकी लढत बघायला मिळाली होती. नितीन देशमुखच्या आक्रमक चढाया आणि सचिन पाताडेची मिळाली साथ त्यामुळे सत्यम सेवा संघाच विजय सोपा झाला.
स्पर्धेतील संक्षिप्त निकाल:-
महिला गट
विजेतेपद- संघर्ष क्रीडा मंडळ
उपविजेते- महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी
उत्कृष्ट चढाईपटू- करीना कामतेकर (महात्मा गांधी स्पो.)
उत्कृष्ट पकडपटू- पूजा जाधव (संघर्ष)
सर्वात्कृष्ट खेळाडु- भक्ती इंदुलकर (संघर्ष)
पुरुष गट
विजेतेपद- सत्यम सेवा मंडळ
उपविजेते- केदारनाथ क्रीडा मंडळ
उत्कृष्ट चढाईपटू- सचिन पाताडे (सत्यम)
उत्कृष्ट पकडपटू- ओंकार कदम (केदारनाथ)
सर्वात्कृष्ट खेळाडु- नितीन देशमुख (सत्यम)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---