दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सध्या सुरू असेलल्या टी-२० मालिकेत भारताचा सलामीवीर इशान किशनने चमकदार कामगिरी केली. या प्रदर्शनाच्या जोरावर त्याने आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. बुधवारी (१५ जून) जेव्हा आयसीसीने त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली, तेव्हा इशान टी-२० फलंदाजांच्या यादीत पहिल्या १० मध्ये सहभागी झाल्याचे पाहिले गेले.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने भारताला जिंकता आले नाहीत. परंतु या दोन्ही सामन्यांमध्ये इशानने महत्वपूर्ण प्रदर्शन केले होते. पहिल्या सामन्यात त्याने ७६, तर दुसऱ्या सामन्यात ३४ धावा केल्या होत्या. इशानच्या या धावा संघासाठी महत्वाच्या ठरल्या. पण तो संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. परंतु मंगळवारी (१४ जून) त्याने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर संघाला विजय मिळवता आला. तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने ३५ चेंडूत ५४ धावा केल्या.
आफ्रिकी संघाविरुद्धची ही टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी इशान क्रमवारीत ७५ व्या स्थानावर होता. पण मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याने १६४ धावा केल्या आणि टी-२० क्रमवारीत थेट ७ व्या क्रमांकाचा फलंदाज बनला. तब्बल ६८ स्थानांची झेप त्याने घेतली आहे. टी-२० क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये सहभागी असलेला इशान किशन (Ishan Kishan) एकमात्र भारतीय खेळाडू आहे. टी-२० मध्ये इशाननंतर केएल राहुल दुसरा सर्वात्तम फलंदाज ठरला आहे, जो १४ व्या क्रमांकावर आहे.
Josh Hazlewood claims No.1 spot🔝
Ishan Kishan gallops into top 10 🔥
Glenn Maxwell, Wanindu Hasaranga gain 🔼Plenty of 📈📉 in the @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings 👉 https://t.co/ebcusn3vBT pic.twitter.com/dyQVqkmRPG
— ICC (@ICC) June 15, 2022
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना ताज्या क्रमवारीत प्रत्येकी एका-एका स्थानाचे नुकसान झाले आहे. रोहित १७ व्या, तर विराट २१ व्या स्थानावर आहे. भारतीय दिग्गज गोलंदाज भुवनेश्वर कुमार, तसेच फिरकीपटू युझवेंद्र चहल यांना देखील ताज्या क्रमवारीत फायदा झाला आहे.
भुवनेश्वरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात १३ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या होत्या, तर चहलने आफ्रिकी संघाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात २० धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या. या प्रदर्शनामुळे क्रमवारीत या दोघांना अनुक्रमे ३ आणि ८ स्थानांचा फायदा झाला आहे. भुवनेश्वर आता टी-२० गोलंदाजांमध्ये ११ व्या, तर चहल २६ व्या स्थानावर आले आहेत. ऑस्ट्रेलियन दिग्गज जोस हजलवुडने टी-२० गोलंदाजांच्या यादीत त्याचा पहिला क्रमांक पुन्हा मिळवला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत तयार, कर्णधार रोहित, कोहली, बुमराहसह ‘हे’ खेळाडू मुंबईत; कधी पकडणार फ्लाईट?
इंग्लंड दौऱ्यात भारतीय कर्णधार खेळणार का?
विराट-केएल राहुलपेक्षा रिषभ पंत सरस, रोहितच्या अनुपस्थित भारतीय संघासाठी प्रथमच केलं ‘हे’ काम