Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका पाकिस्तानविरुद्ध ‘चोकर्स’च, आकडेवारी चकित करणारी

टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका पाकिस्तानविरुद्ध 'चोकर्स'च, आकडेवारी चकित करणारी

November 3, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter

Photo Courtesy: Twitter


ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत गुरूवारी (3 नोव्हेंबर) पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका समोरासमोर आले. स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणे कोणत्याही परिस्थितीत जिंकणे अत्यावश्यक होते आणि झालेही तसेच. हा सामना पाकिस्तानने डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 33 धावांनी जिंकला. हा सामना जिंकताच त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक विक्रम कायम राखला आहे.

टी20 विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका चार वेळा समोरा-समोर आली. हे दोन्ही संघ टी20 विश्वचषकात पहिल्यांदा दुसऱ्या आवृत्तीत एकमेकांशी भिडले. 2009चा तो सामना पाकिस्तानने केवळ 7 धावांनी जिंकला. पुढील भेट 2010मध्ये झाली. त्यामध्येही पुन्हा एकदा पाकिस्ताननेच बाजी मारत सामना 11 धावांनी जिंकला. तिसरी भेट 2012च्या स्पर्धेत झाली आणि तेथे पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण केली. चालू असलेल्या हंगामावरून टी20 विश्वचषकात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाचा एकप्रकारे चौकारच मारला.

सिडनीमध्ये खेळलेल्या सुपर 12च्या सामन्याआधी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 21 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले गेले. त्यातील 11 सामने पाकिस्तानने जिंकले.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी 7 षटकातच 43 धावसंख्येवर 4 विकेट्स गमावल्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अडचणीत आला होता. नंतर उपकर्णधार शादाब खान याने 52 आणि इफ्तिखार अहमद याने 51 धावा केल्या. यामुळे त्यांच्या 20 षटकात 9 बाद 185 धावसंख्या झाल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉकची विकेट लवकरच गमावली. तसेच पाऊस पडल्याने सामना 14 षटकांचा केला गेला. यावेळी त्यांच्यासमोर 142 धावांचे लक्ष्य होते. त्यांना शेवटच्या 5 षटकात विजयसाठी 73 धावांची आवश्यकता होती. यावेळी पाकिस्तानची उत्तम गोलंदाजी की त्यांचे लक किंवा दक्षिण आफ्रिकेची वाईट फलंदाजी. यामुळे हा सामना पुन्हा एकदा पाकिस्तानने टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले.

Dominant performance to seal a commanding win 💪#WeHaveWeWill | #T20WorldCup | #PAKvSA pic.twitter.com/6PCBGBXVWR

— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 3, 2022

पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका टी20 विश्वचषक सामने-
2009 – पाकिस्तान 7 धावांनी विजयी
2010 – पाकिस्तान 11 धावांनी विजयी
2012 – पाकिस्तान 2 विकेट्सने विजयी
2022 – पाकिस्तान 33 धावांनी विजयी (डीएलएस)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे! पाकिस्तानच्या खेळाडूंना आयसीसीच्या नियमांचा विसर, चेंडू बॅटला लागला तरी एलबीडब्ल्यूसाठी…
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्यावर गोळीबार, रुग्णालयात दाखल


Next Post
Virat-Kohli

भारताकडून टी20 विश्वचषकात विराटच करतोय सर्वाधिक धावा; गंभीर, रैना अन् रोहितही मागेच

AB-De-Villiers

आरसीबीची दक्षिण आफ्रिकी तोफ भारतात दाखल! कारणही तितकंच खास

iftikhar ahmed

T20WC2022 | पाकिस्तानी पठ्ठ्याने मारला सर्वात लांब षटकार, पहिल्या 10मध्ये नाहीये एकही भारतीय

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143