पुणे। भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी ) आयोजित ‘स्पोर्ट्स मीट २०२२’ या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन रविवारी झाले.भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते रविवारी सकाळी उद्घाटन झाले.
प्रा नेताजी जाधव यांच्यासहित अनेक मान्यवर या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते. 20 मार्च, ३ एप्रिल, 10 एप्रिल अशा तीन टप्प्यात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सातशेहून अधिक क्रीडापटू सहभागी होत असून क्रिकेट, बास्केटबॉल, हॉलीबॉल, टेबल टेनिस, टग ऑफ वॉर, बुद्धिबळ, ट्रिपल लेग रेस अशा क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आठवणीतील खेळी: कॅन्सरशी झुंज देत युवराजने १० वर्षांपूर्वी ठोकले होते ‘ते’ ऐतिहासिक शतक, पाहा व्हिडिओ
आयपीएल इतिहासातील एकमेव भारतीय गोलंदाज, ज्याने केलाय २ वेळा ५ विकेट्स घेण्याचा कारनामा
अफलातून! ‘लेडी सेहवाग’चा षटकार पाहून चाहतेही दंग; म्हणाले, ‘लवकरच मोडणार रोहितचा रेकॉर्ड’