भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे चार सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. मात्र भारतीय संघाने मेलबर्न येथे झालेल्या दुसर्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत बरोबरी केली. परंतु भारतीय संघातील खेळाडूंना दुखापतीने ग्रासले आहे. कारण केएल राहुलला दुखापत झाली आहे आणि तो या मालिकेतून बाहेर पडला आहे. परंतु दुसरीकडे टी नटराजन कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून सिडनीत खेळला जाणार आहे. या मालिकेतील हा तिसरा सामना जिंकण्याचे दोन्ही संघाचा निर्धार असणार आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ मालिकेत 2-1 या फरकाने आघाडी घेता येईल. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी मोठी संधी मिळेल. त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हन मध्ये बदल केले जाऊ शकते. कारण भारतीय संघाचा प्रमुख सलामी फलंदाज रोहित शर्माने क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे.
त्यामुळे तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. त्याचबरोबर उमेश यादवच्या जागी टी नटराजनला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर टी नटराजन कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहे. त्याने भारतीय कसोटी संघाची जर्सी घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
A proud moment to wear the white jersey 🇮🇳 Ready for the next set of challenges 👍🏽#TeamIndia @BCCI pic.twitter.com/TInWJ9rYpU
— Natarajan (@Natarajan_91) January 5, 2021
टी नटराजनने आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन भारतीय कसोटी संघाची जर्सी घातलेला फोटो शेअर केला आहे, त्याचबरोबर लिहले की, “भारतीय कसोटी संघाची जर्सी परिधान करणे हा क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मी पुढील आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार आहे.” यापूर्वी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाली होती होती. त्यामुळे बीसीसीआयने त्याच्या जागी यॉर्कर किंग टी नटराजनला संधी दिली आहे. त्यामुळे तिसर्या कसोटी सामन्यात नटराजन भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसू शकतो.
भारतीय संघाला या मालिकेत दुखापतीने ग्रासले आहे. आता पर्यंत या मालिकेत तीन खेळाडूना दुखापत झाली आहे. एॅडलेड येथे येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापत झाली होती. त्यानंतर मेलबर्न येथे दुसर्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाली आहे. तसेच आता फलंदाज केएल राहुलला सराव सत्रात दुखापत झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
चौथ्या कसोटीचे आयोजन स्थळ बदलण्याच्या चर्चांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे स्पष्टीकरण, म्हणाले
पुन्हा बाहेर जेवणासाठी जाऊ नकोस! शुभमन गिलला मिळाला मजेशीर सल्ला
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर, उद्या मिळू शकतो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज