टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना गुरूवारी (10 नोव्हेंबर) ऍडलेडच्या ओव्हलवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ 9 वर्षानंतर आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत समोरासमोर येत आहेत. मागे जेव्हा हे संघ एकमेंकाविरोधात आले होते तेव्हा भारताचा कर्णधार एमएस धोनी होता. 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला होता. तसेच टी20 प्रकारामध्ये भारतीय फलंदाज नेहमीच इंग्लंडची झोप उडवतात. यामुळे उपांत्य सामन्यातही त्याच उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
भारताच्या फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये एकूण 10 शतके केली आहेत. त्यातील 3 शतके तर एकट्या इंग्लंडविरुद्धच केली. हे टी20मध्ये भारतीय फलंदाजाकडून कोणत्याही संघाविरोधात सर्वाधिक शतके ठरली आहेत. इंग्लंडविरोधात शतकी खेळी करणाऱ्यांमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांचा समावेश आहे. सूर्यकुमारने तर याचवर्षी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पहिले शतक ठोकले. India’s most T20 centuries against England
टी20मध्ये अर्धशतकांची आकडेवारी पाहिली तर भारताने इंग्लंडविरुद्ध एकूण 14 अर्धशतके ठोकली आहेत. इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक अर्धशतके करण्याची कामगिरी विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 4 अर्धशतके केली आहेत. त्याच्याशिवाय रोहितने इंग्लंडविरुद्ध 2 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. धोनी, राहुल, सूर्यकुमार, हार्दिक पंड्या. सुरेश रैना, गौतम गंभीर, श्रेयस अय्यर आणि युवराज सिंग यांनीही इंग्लंडविरुद्ध किमान एकतरी 50 धावांची खेळी केली आहेत.
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक टी20 धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिचं याच्या नावार आहे. त्याने 619 धावा केल्या आहेत. तसेच विराट दुसऱ्या स्थानावर असून त्याने 19 डावांमध्ये 39.26च्या सरासरीने 589 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 57 चौकार आणि 17 षटकांराचा समावेश आहे. तसेच रोहितने 13 डावांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या सहाय्याने 383 धावा केल्या आहेत. त्याने इंग्लंडविरुद्ध 39 चौकार आणि 16 षटकार मारले आहेत.
इंग्लंड विरुद्ध सूर्यकुमारची बॅट अधिक तळपते. त्याने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 6 सामन्यात 52च्या सरासरी आणि 195च्या स्ट्राईक रेटने 260 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय टी20मधील आपले पहिले अर्धशतक आणि शतक इंग्लंडविरुद्धच केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvENG: विराट-सूर्यापेक्षा ‘या’ युवा स्टारकडून संघाला अधिक अपेक्षा, चमकला तर विजय निश्चित!
‘परमेश्वराला आमच्याकडून मेहनत हवीये…’, अंतिम सामन्यात धडक देताच रिझवानची मोठी प्रतिक्रिया