बंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 109 धावांवरच संपुष्टात आला आहे. यामुळे अफगाणिस्तानवर फॉलोआॅनची नामुष्की ओढावली आहे.
भारताने गोलंदाजी करताना चांगली सुरवात केली होती. पहिल्या 10 षटकातच भारताच्या गोलंदाजांनी 4 विकेट घेतल्या. त्यामुळे अफगाणिस्ताच्या फलंदाजांना जम बसवणे अवघड जात होते.
अफगाणिस्तानकडून पहिल्या डावात सर्वाधिक धावा मोहम्मद नबीने केल्या. त्याने 44 चेंडूत 24 धावा केल्या. यात 4 चौकारांचा समावेश आहे.
अफगाणिस्तानच्या बाकी फलंदाजांपैकी मोहम्मद शेहजाद(14), रेहमत शहा(14), हशमतुल्लाह शाहिदी(11), कर्णधार असघर स्टॅनिकझाई(11) आणि मुजीब रेहमान(15) यांनी दोन आकडी धावसंख्या पार केली. परंतू जावेद अहमदी(1), अफसर झझाई(6), रशीद खान(7) आणि वफादार(6) यांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही.
भारताकडून आर आश्विनने सर्वाधिक 27 धावा देत 4 विकेट घेतल्या. बाकी गोलंदाजांपैकी रविंद्र जडेजा(2/18), इशांत शर्मा(2/28) आणि उमेश यादव(1/18) यांनी विकेट घेत अफगाणिस्तानचा पहिला डाव 27.5 षटकात सर्वबाद 109 धावांवर संपुष्टात आणला.
संक्षिप्त धावफलक:
भारत पहिला डाव: सर्वबाद 474 धावा
अफगाणिस्तान पहिला डाव: सर्वबाद 109 धावा
महत्त्वाच्या बातम्या:
–व्हायच होतं डॉक्टर पण झाला अव्वल क्रमांकाचा गोलंदाज
–शिखर धवन-मुरली विजय बरोबर आणखी एका भारतीय खेळाडूचे खास शतक