भारतीय संघ विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभूत झाला. हा पराभव भारतीय क्रिकेटप्रेमींना पचवणे कठीण जात आहे. असे असले, तरीही आता विश्वचषकानंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. येत्या 23 नोव्हेंबरपासून उभय संघात 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू होत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर या मालिकेत खेळताना दिसणार नाही. अनुभवी खेळाडूने विश्वचषकातील यशस्वी अभियानानंतर मालिकेतून आपले नाव मागे घेतले असून तो मायदेशी परतणार आहे.
ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने या मालिकेपूर्वी आपल्या काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. आता डेविड वॉर्नर (David Warner) हादेखील मालिकेतून बाहेर पडला आहे. अष्टपैलू ऍरॉन हार्डी (Aaron Hardie) याला सलामीवीराच्या रूपात बदली खेळाडूच्या रूपात सामील करण्यात आले आहे. डेविड वॉर्नर विश्वचषक 2023 (David Warner World Cup 2023) स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला. त्याने 535 धावांसह स्पर्धेचा शेवट केला आणि स्वत:वर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला.
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क या त्रिकुटाला आधी विश्रांती दिली होती. अशात आता वॉर्नरनेही आगामी कसोटी मालिकेच्या तयारीसाठी आपले नाव मागे घेतले आहे. विस्फोटक वॉर्नरने आधीच पुढील वर्षी सिडनीमध्ये होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली आहे.
David Warner decides to take a rest in the T20I series vs India.
– Steve Smith is set to open….!!!! pic.twitter.com/qnw479hkFk
— Johns. (@CricCrazyJohns) November 21, 2023
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात म्हटले की, “निवडकर्त्यांनी निर्णय घेतला आहे की, वॉर्नर विश्वचषकातील यशस्वी प्रदर्शनानंतर मायदेशी परतणार आहे.”
वॉर्नर या मालिकेत खेळणार नसला, तरीही ऑस्ट्रेलियाचे विश्वचषक 2023 विजेत्या संघातील 7 खेळाडू टी20 मालिकेत खेळताना दिसतील. यामध्ये सीन ऍबॉट, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस आणि ऍडम झम्पा यांचा समावेश आहे. तसेच, राखीव फिरकीपटू तन्वीर संघा याचाही संघात समावेश आहे.
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा सुधारित संघ
मॅथ्यू वेड (कर्णधार), ट्रेविस हेड, स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, टीम डेविड, जोश इंग्लिस, ऍरॉन हार्डी, जेसन बेहरेनडोर्फ, सीन ऍबॉट, नेथन एलिस, केन रिचर्डसन, ऍडम झम्पा, तन्वीर संघा (ind vs aus 2023 cricketer david warner opted out of the upcoming five match t20i series against india know here)
हेही वाचा-
INDvsAUS Final: ऑस्ट्रेलियाने का जिंकला वर्ल्डकप? ‘या’ निर्णयामुळे बनले सहाव्यांदा चॅम्पियन, सेहवागचा खुलासा
नीरजचा अपमान! WC Finalमध्ये टीव्हीवर दिसला नाही ‘चॅम्पियन’; नेटकरी म्हणाले, ‘कॅमेरामनने बॉलिवूडचे गुटखा…’