पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने भारताविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2025 च्या तिसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव बदल जोश हेझलवूडच्या रूपाने झाला आहे. हेजलवूड दुखापतीमुळे ॲडलेड कसोटी खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत स्कॉट बोलंडला संधी मिळाली होती. पण आता हेझलवूड तंदुरुस्त असून पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. अशा स्थितीत बोलंडला बाहेर बसावे लागणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
कर्णधार पॅट कमिन्सने गाबा येथे स्कॉट बोलंडच्या जागी हेझलवूडचा समावेश केला जाईल याची पुष्टी केली. ॲडलेड पिंक बाॅल कसोटीत 5 विकेट्स घेऊनही बोलंडला आपले स्थान गमावणे थोडे दुर्दैवी होते हे त्याने मान्य केले.
पाच सामन्यांची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका सध्या 1-1 अश्या स्थितीत आहे. भारताने पर्थ कसोटी 295 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून मालिकेत दमदार सुरुवात केली होती. मात्र ॲडलेड कसोटीत कांगारूंनी दमदार पुनरागमन करत टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. मालिकेतील तिसरा सामना उद्या 14 डिसेंबरपासून गाबा येथे खेळवला जाणार आहे.
🚨 JOSH HAZLEWOOD IS BACK. 🚨
– Hazlewood has replaced Scott Boland for the Gabba Test. pic.twitter.com/Shi2UjRVSV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 13, 2024
मालिकेतील शेवटचे तीन कसोटी सामने येत्या 25 दिवसांत खेळवले जाणार आहेत. त्यामुळे पॅट कमिन्सला आशा आहे की बोलंडला आणखी एक संधी मिळू शकते.
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन: उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवूड
हेही वाचा-
गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यातील वर्ल्ड चॅम्पियनशिप सामन्याची चाैकाशी करा, रशियन बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षांची मागणी
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, गॅरी कर्स्टननंतर आता या प्रशिक्षकाचा राजीनामा
विश्वविजेत्या गुकेशला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली? सर्वात तरुण विजेत्याची एकूण संपत्ती जाणून बसेल धक्का!