ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला आयसीसीने नुकतेच दशकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून जाहीर केले आहे. मात्र भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात स्टीव्ह स्मिथ सपशेल अपयशी ठरला आहे. त्याच्याबद्दल बोलताना ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले की स्टीव्ह स्मिथ महान खेळाडू आहे. त्यामुळे तो केव्हा ही पुनरागमन करू शकतो.
स्टीव्ह स्मिथला दशकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून आयसीसीने जरी निवडले असले, तरी त्याला भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यात आपल्या नावाला साजेशी खेळी करताना आलेली नाही. मात्र स्टीव्ह स्मिथला भारताविरुद्ध फलंदाजी करायला आवडते. त्याने वनडे मालिकेत शतक ठोकले होते. त्यानंतर कसोटी मालिकेत त्याची बॅट थंडावली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेनला तिसर्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथचा फॉर्म परत येण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला बरोबरीनंतर या मालिकेत आघाडी घेता येईल.
तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले, “महान खेळाडू खूप वेळ पर्यंत चूका करू शकत नाही. विचार करून बघा एकदा की जर स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करू लागला आणि त्याला सूर गवसला तर काय होईल. मालिकेत आतापर्यंत त्याने काही खास केले नाही. त्यानंतर त्याने स्वत: पुढे येऊन ही गोष्ट मान्य केली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की महान खेळाडू आपल्या खराब फॉर्मसोबत खूप काळ झुंजत राहू शकत नाही आणि हा विचार माझ्या चेहर्यावर हास्य निर्माण करतो. ”
त्याचबरोबर जस्टीन लँगर यांना विचारण्यात आले की, तुम्ही स्टीव्ह स्मिथला कशी कोचिंग करता ? त्यावर बोलताना जस्टीन लँगर म्हणाले, “स्टीव्ह स्मिथला मी कोचिंग करत नाही, तो स्वत:च आपल्याला कोचिंग करतो. त्यामुळे मला या गोष्टीचा पूर्ण भरवसा आहे की, तो लवकरच पुनरागमन करेल. स्टीव्ह स्मिथ खूप चेंडू फटकावतो. त्याने मेलबर्नवर खूप सार्या मोठ्या खेळ्या साकारल्या होत्या. मधल्या फळीत त्याची जागा कोणी घेवू शकत नाही. आम्हाला माहित आहे तो कशाप्रकारे अवघड परिस्थितीचा सामना करतो. आम्हाला माहित आहे, तो किती महान खेळाडू आहे.”
याच्या अगोदर जस्टीन लँगर यांनी आशा व्यक्त केली होती, डेविड वॉर्नर संघात पुनरागमन करेल आणि संघाच्या फलंदाजीची सुरुवात करेल. स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत या मालिकेत दोन सामने खेळले आहेत त्यापैकी चार डावात त्याने 1, 1, 0 आणि 8 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
चौथ्या कसोटीचे आयोजन स्थळ बदलण्याच्या चर्चांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे स्पष्टीकरण, म्हणाले…
पुन्हा बाहेर जेवणासाठी जाऊ नकोस…! शुभमन गिलला मिळाला मजेशीर सल्ला
“तिसऱ्या सामन्यात रोहित द्विशतक ठोकेल”, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी






