Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर बिघडले भारताचे गणित! कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गाठणे कठीणच

ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर बिघडले भारताचे गणित! कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गाठणे कठीणच

March 3, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit Sharma Virat Kohli

Photo Courtesy: bcci.tv


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना शुक्रवारी (3 मार्च) म्हणजेच कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी निकाली निघाला. इंदोरच्या होळकर स्टेडियवर खेळल्या गेलेल्या सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल होती. परिणामी दोन्ही संघाचे फलंदाज अपेक्षित धावा करताना दिसले नाहीत. सामन्याच्या दिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्स राखून विजय मिळवला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील ऑस्ट्रेलियाचे स्थान या विजयानंतर पक्के झाले आहे. दुसरीकडे भारतीय संघाला मात्र अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी अजून कसरत करावी लागणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेचे पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने मोठ्या अंतराने गमावले. सलग दोन विजयांनंतर तिसऱ्या सामन्यात देखील भारत जिंकेल, असाच चाहत्यांचा समज होता. परंतु भारताला पराभव स्वीकारावा लागला आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे पूर्ण गणित बदलून गेले. भारताने इंदोर कसोटीत विजय मिळवला असता, तर संग कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी स्वतःची जागा पक्की करू शकत होता. 7 जून ते 11 जून दरम्यान हा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर आयोजित केला जाणार आहे.

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून शुक्रवारी पराभव मिळाल्यामुळे अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे त्यांचे स्पप्न अद्याप पूर्ण होताना दिसत नाहीये. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारतीय संघाकडे अजून दोन संधी आहेत. यातील पहिली संधी संघ स्वतःच्या प्रदर्शनाने सार्थी लावू सकतो, तर दुसरी संधी मात्र इतरांच्या प्रदर्शनावर अवलंबून असेल. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेचा चौथा सामना येत्या 9 मार्च पासून सुरू होणार आहे. या सामन्यात जर भारताने विजय मिळवला, तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी अंतिम सामना केळला जाईल. पण यासाठी मालिकेतील चौथा कसोटी सामना भारताला जिंकावा लागणार आहे.

दुसरीकडे मार्च महिन्यातच श्रीलंक संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड दौरा करणार  आहे. या मालिकेतील एक सामना श्रीलंकेने जिंकला किंवा अनिर्णित केला, तरीदेखील भारत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकतो. न्यूझीलंड दौऱ्यातील पहिला सामना श्रीलंकन संघाला 9 मार्चपासून 13 मार्चपर्यंत खेळायचा आहे, तर दुसरा सामना 17 ते 21 मार्चदरम्यान खेळला जाईल. असात भारतीय संघाचे भविष्य श्रीलंकन संघाच्या प्रदर्शनावर देखील अवलंबून असेल.

दरम्यान, बॉर्डर गावसकर मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांचा विचार केला, तर भारताने पहिला सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. तर मालिकेतील दुसरा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला. पण मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी अप्रतिम प्रदर्शन करत भारताच्या दांड्या उडवल्या. परिणामी 9 विकेट्सने भारत पराभूत झाला.
(IND vs AUS BGT 2023 Qualification scenario for India for WTC final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट इतिहासातील काळा दिवस! कसाबसा अंपायर सायमन टफेल यांनी आपला प्राण वाचवला
कांगारुंचे कमबॅक! इंदोर कसोटीत भारताचा तिसऱ्या दिवशी सकाळीच लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये


Next Post
Rohit-Sharma-And-Steve-Smith

स्मिथने लावला रोहितच्या स्वप्नांना सुरुंग, इंदोर कसोटीत होणारा 'तो' रेकॉर्ड आता कधीच नाही होणार

Australia Team (Test)

मायदेशातील कसोटीत भारताची जबरदस्त आकडेवारी, फक्त तिसऱ्यांदा आलीये मान खाली घालण्याची वेळ

Lionel-Messi

मेस्सीचा जीव धोक्यात! कुटुंबाच्या सुपरमार्केटवर हल्लेखोरांकडून गोळीबार, स्टार फुटबॉलपटूला धमकी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143