भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. यासोबतच त्यांनी मालिकाही गमावली आहे. अशामध्ये बुधवारी (०२ नोव्हेंबर) तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला आपला सन्मान वाचवण्यासाठी विजय मिळवावा लागेल. मागील दौऱ्यात आपल्या घातक गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकायला भाग पाडणारा जसप्रीत बुमराह आतापर्यंतच्या २ सामन्यात खूपच महागडा ठरला आहे. असे असले तरीही माजी भारतीय सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने बुमराहला भारतीय संघाचा एक्स फॅक्टर खेळाडू म्हटले आहे.
स्टार स्पोर्ट्ससोबत चर्चा करताना गंभीर म्हणाला की, “मी जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूशिवाय दुसऱ्या खेळाडूकडे पाहू शकत नाही. तो तुमचा एक्स फॅक्टर आहे. केवळ टी२० मध्येच नाही, तर प्रत्येक क्रिकेटमध्ये नेहमीच तो तुमचा एक्स फॅक्टर राहील. नक्कीच तुमच्याकडे विराट कोहली, केएल राहुल आणि इतर खेळाडू आहेत. परंतु जसप्रीत बुमराह एकदम विशेष आहे. मी नेहमीच म्हणतो की गोलंदाजच असतात, जे तुम्हाला विजय मिळवून देतात आणि बुमराह जागतिक दर्जाचा खेळाडू आहे.”
टी२० मालिकेत भारतीय संघासाठी सर्वात मोठे आव्हान काय असेल?, यावर बोलताना गंभीरने म्हटले, “खरं बोलायचं झालं, तर सहावा गोलंदाजी पर्याय सर्वात पहिले आणि सर्वात मोठे आव्हान असणार आहे. कारण हार्दिक पंड्या अजूनही गोलंदाजीसाठी पूर्णपणे फीट नाही. अशामध्ये भारतीय संघ कोणत्या काँबिनेशनसोबत टी२० मालिकेत उतरेल, हे एक मोठे आव्हान असेल. प्लेईंग इलेव्हनमध्ये भारतीय संघ कोणत्या काँबिनेशनसोबत उतरणार हे पाहावे लागेल.”
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला ४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट फलंदाजीला आल्यावर मला झोपेतून उठवा’, आपल्या मुलाबद्दल इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य
शाहरुख खानने विकत घेतला आणखी एक टी२० संघ, ‘या’ लीगमध्ये घेणार भाग
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ