भारताच्या टी20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्या याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र, आता तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील वनडे मालिकेतही भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे. उभय संघातील वनडे मालिकेला 17 मार्चपासून वानखेडे स्टेडिअमवर सुरुवात होणार आहे. या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणांमुळे खेळू शकणार नाही. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी पंड्यावर आली आहे. अशात भारतीय संघाचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी पंड्याच्या कर्णधारपदाबबात मोठे भाष्य केले आहे. त्यांनी सांगितले आहे की, पंड्या वनडे विश्वचषकानंतर भारताचा नियमित कर्णधार बनू शकतो, फक्त त्यासाठी त्याला एक काम करावे लागणार आहे.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी म्हटले की, “टी20 क्रिकेट प्रकारात हार्दिक पंड्या याने आधी गुजरात टायटन्स आणि त्यानंतर भारतीय संघाचे ज्याप्रकारे नेतृत्व केले, त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. माझा विश्वास आहे की, जर पंड्याने मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना जिंकला, तर 2023चा वनडे विश्वचषक संपल्यानंतर तुम्ही त्याला भारताच्या नियमित कर्णधाराच्या रूपात हिरवा कंदील दाखवू शकता.”
गावसकरांनी स्टार स्पोर्ट्सच्या एका शोमध्ये म्हटले की, “मधल्या फळीत पंड्याची उपस्थिती भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. तो या खेळपट्टीवर सामना पालटणारा खेळाडू ठरू शकतो.”
‘पुढे येऊन घेतो जबाबदारी’
सुनील गावसकर यांनी पंड्याच्या जबाबदारीबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले की, “हार्दिक पंड्या एक असा खेळाडू आहे, जो जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे. तो पुढे येऊन संघाचे नेतृत्व करतो. पंड्याच्या नेतृत्वाची पद्धतही इतर खेळाडूंना आवडते. तुम्ही पाहिले असेल की, कर्णधार म्हणून हार्दिक संघातील इतर खेळाडूंना चांगले वाटावे, यासाठी प्रयत्न करतो. तो खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवून स्थिती व्यवस्थित सांभाळतो.”
खरं तर, 29 वर्षीय हार्दिक पंड्या याने आयपीएल 2022 स्पर्धेत पहिल्यांदा गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करत त्यांना विजेतेपद जिंकून दिले होते. तसेच, तो टी20 क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचे आधीपासूनच नेतृत्व करत आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात पंड्या कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (ind vs aus sunil gavaskar said after world cup 2023 hardik pandya can become the regular captain indian odi team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आयपीएलच्या माजी खेळाडूला पोलिसांकडून अटक, व्यावसायिकाची केलेली 12 लाखांची फसवणूक
विश्वविजेत्या इंग्लंडच्या ‘या’ कमजोरीमुळे बांगलादेशने जिंकली टी20 मालिका, कर्णधार शाकिबचा मोठा खुलासा