भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणना होते. त्याने आपल्या खेळीने क्रिकेट जगतातील मोठमोठ्या दिग्गजांनाही प्रभावित केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन्ही प्रकारच्या क्रिकेटची मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी कोहलीचे जोरदार कौतूक केले आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच खेळेल दिवस-रात्र कसोटी
ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर भारतीय संघ तीन वनडे सामन्यांची आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर चार कसोटी सामन्यांची मालिका होईल. ऍडलेडमध्ये पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जाईल. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाबरोबर दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सामन्यानंतर कोहलीला दौरा सोडून वैयक्तिक कारणास्तव भारतात परत यावं लागणार आहे.
कोहली सामर्थ्यवान खेळाडू -मार्क टेलर
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी कोहलीची स्तुती करताना म्हटले की, “मला वाटते की जागतिक क्रिकेटमध्ये तो खूप सामर्थ्यवान खेळाडू आहे. मला असे वाटते की तो आक्रमक खेळाडू आहे आणि खेळाचे नेतृत्व करण्याच्या अगदी लहान गोष्टींचीही त्याला कल्पना आहे. त्यांने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.”
विराट खेळाडूंचा करतो आदर
“मला वाटते की त्याने आपली जबाबदारी अतिशय आदरपूर्वक पार पाडली आहे. जेव्हा मी त्याच्याशी बोललो, तेव्हा मला कळले की तो या खेळाचा खूप आदर करतो. इतकेच नाही, तर वरिष्ठ खेळाडू आणि वर्तमानकाळात जे सध्या खेळत आहेत त्यांचाही तो तितकाच आदर करतो,” असेही पुढे बोलताना मार्क म्हणाले.
विराट सर्वोत्कृष्ट – जस्टिन लँगर
ऑस्ट्रेलियाचे विद्यमान प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनीही कोहलीची प्रशंसा केली होती. त्यांनी म्हटले होते की, “आयुष्यात पाहिलेल्या सर्व खेळाडूंमध्ये विराट सर्वोत्कृष्ट आहे. मी हे फक्त त्याच्या फलंदाजीबद्दलच बोलत नाही. खेळाबद्दलची त्याची इच्छा आणि ऊर्जा अप्रतिम आहे. विशेषत: ज्या प्रकारे तो क्षेत्ररक्षणात स्वतःला झोकून देतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
नेमकं चाललंय तरी काय! अजित आगरकरच्या IPL २०२० प्लेइंग इलेव्हन मधूनही ‘रोहित-विराट’ गायब
“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिर्ची…”, युवराज सिंगकडून सानिया मिर्झाला अनोखी उपाधी
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘तो’ भारताचा महान गोलंदाज बनेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर