वनडे विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला घरच्या मैदानात पराभूत केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा अंतिम सामना आयोजित केला गेला होता. भारतीय संघ या सामन्यात फलंदाजी आणिया क्षेत्ररक्षणात कमी पडल्याे दिसले. ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा विजय असला, तर त्यांचा अष्टपैलू मिचेल मार्श याला विश्वचषक ट्रॉफीचे काहीच नवल नसल्याचे दिसते.
वनडे विश्वचषक जिंकणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. रविवारी (19 नोव्हेंबर) अंतिम सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला. अशात संघातील बहुतांश खेळाडूंसाठी ही विश्वचषक जिंकण्याची शेवटची संधी होती. विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, अशा खेळाडूंसाठी हा शेवटचा वनडे विश्वचषक ठरू शकतो. पण दुसरीकडे विजेतेपद मिळवणाऱ्या मिचेल मार्श () याच्याकडून विश्वचषक ट्रॉफीच अपमान झाल्याचे, चाहते म्हणत आहेत.
सोशल मीडियावर मिचेल मार्श याचा एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल पोटोत मार्शने विश्वचषक ट्रॉफीवर चक्क पाय ठेवून फोटो काढला आहे. हा फोटो कोट्यावधी भारतीयांच्या मनाला ठेच पोहोचवणारा ठरत आहे. सोशल मीडियावर चाहत्याकंडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. बहुतांश चाहत्यांच्या मते मार्शचे हे वर्तन एगदी चुकीचे आहे.
दुसरीकडे काहीजण असेही म्हणत आहेत की, ऑस्ट्रेलियन संस्कृतीत अशा गोष्टींना महत्व दिले जात नाही. अशात मार्शने कोणताही हेतू मनात ठेवून हे कृत्य केले नसावे. सोशल मीडियावर मार्श सध्या ट्रेटिंगचा विषय बनला आहे.
दरम्यान, उभय संघांतील या अंतिम सामन्यावर नजर टाकली, तर प्रथम फलंदाजी करताना भारताने 240 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 43 षटकांमध्ये 4 विकेट्सकडून करताना 241 धावांचे लक्ष्य गाठले. ट्रेविस हेड याने 137 धावांची मॅच विनिंग खेळी ऑस्ट्रेलियासाठी केली आणि सामनावीर ठरला. (IND vs AUS World Cup Final । photograph of Mitchell Marsh with his foot on the World Cup trophy)
महत्वाच्या बातम्या –
140 कोटी भारतीयांनो दु:खी होऊ नका! Team Indiaने 12 पैकी ‘एवढे’ पुरस्कार केलेत नावावर, तुम्हालाही वाटेल अभिमान
CWC2023Final । पराभवानंतरही विराटच ठरला मालिकावीर! जाणून घ्या संपूर्ण हंगामातील प्रदर्शन