---Advertisement---

धरमशालेच्या थंडीत सरफराजनं फोडला इंग्लिश गोलंदाजांना घाम! झळकावलं झंझावाती अर्धशतक

---Advertisement---

मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज सरफराज खानला दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालं. आता तो त्याला मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा उचलतोय.

सरफराज खाननं आज आणखी एक अर्धशतक झळकावलं. धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यात त्यानं झंझावाती अर्धशतक ठोकलं. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील तिसरं अर्धशतक आहे. 26 वर्षीय सरफराजची ही डेब्यू सीरिज आहे. तो त्याच्या कारकिर्दीतील केवळ तिसरा कसोटी सामना खेळतोय.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सरफराज खाननं आपल्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार मारला. त्यानं अवघ्या 55 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तो 60 चेंडूत 56 धावा करून बाद झाला. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 93.33 इतका होता. यावरून लक्षात येतं की त्यानं इंग्लिश गोलंदाजांची किती वाईट पद्धतीनं पिटाई केली.

सरफराज खाननं राजकोटमधील पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतकं झळकावली होती. मात्र, सरफराज रांचीमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात फ्लॉप झाला. या कसोटीतील दोन डावांत त्यानं अनुक्रमे 14 आणि 0 धावा केल्या. मात्र तो धरमशाला कसोटीमध्ये पूर्ण तयारीनीशी उतरला आणि या खेळीसह दाखवून दिलं की तो टीम इंडियामधील आपली जागा सहजासहजी सोडणार नाही.

यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यात धरमशाला येथे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जातोय. या सुंदर मैदानावर भारतीय संघानं पहिल्या दिवसापासूनच आपला दबदबा कायम ठेवला. भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लिश संघाला 218 धावांत आटोपलं. यानंतर आज भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली.

भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकं झळकावली. रोहित 162 चेंडूत 103 आणि गिल 150 चेंडूत 110 धावा करून बाद झाला. तर यशस्वी जयस्वालनं 58 चेंडूत 57 आणि देवदत्त पडिक्कलनं 103 चेंडूत 65 धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

दिग्गज पंच मारायस इरास्मस निवृत्त, 2019 च्या वर्ल्डकप फायनलसह अनेक ऐतिहासिक क्षणांचे राहिले साक्षीदार

शुबमन गिलचं टीकाकारांना सडेतोड उत्तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ठोकलं शानदार शतक

डॉन ब्रॅडमननंतर यशस्वीचाच नंबर! क्रिकेटच्या ‘या’ खास लिस्टमध्ये मिळवलं स्थान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---