भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना (1st Match of ODI) आज (5 जानेवारी) सेडन पार्क (Seddon Park), हॅमिल्टन (Hamilton) येथे खेळण्यात आला आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यापूर्वी नाणेफेकीवेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) भारताच्या 11 जणांचा संघ जाहीर केला. यामध्ये मनीष पांडेला (Manish Pandey) संधी न देता केदार जाधवला (Kedar Jadhav) संघात स्थान देण्यात आले. त्यामुळे विराटला ट्विटरवर चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
या वनडे सामन्यात केदार जाधवला संधी दिल्यामुळे चाहत्यांनी विराटच्या संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी काही चाहत्यांनी मनीष पांडेच्या उत्कृष्ट कामगिरीचा संदर्भ देत त्याला संघातून बाहेर काढण्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी जाधवच्या निवडीवर प्रश्न केला आहे.
इतकेच नाही, काहींनी तर बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीलाही (Sourav Ganguly) प्रश्न विचारले आहेत.
Kedhar jadav ko lene ki Kya jaroorat bc 😂😂 na to world cup khel me rakhenge😂 virat ko 32 toooopoo ki salami…
Manish Pandey , pant jaise Aram se bethe Hain.
Opener ko 5 no me bhej Diya 😂😂😂😂😂.. Jo t20 worldcup me Opener hoga.
Waah Re @imVkohli captain.
— ROWDY RAKESH (@akshay_kingdom) February 5, 2020
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेआधी पार पडलेल्या 5 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील 4 सामन्यांमध्ये मनीष पांडे नाबाद राहिला होता. तसेच चौथ्या सामन्यात त्याने नाबाद अर्धशतकी खेळी केली होती, ज्याची भरपूर प्रशंसा करण्यात आली होती.
चाहत्यांकडून विराटच्या संघ निवडीवर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न-
#manishpandey k sht glt hora hai bhai #NZvsIND
— Lokesh supyal (@imlokeshsupyal) February 5, 2020
#starniadugu
How would it be justified by picking kedhar Jadhav instead of Manish Pandey considering their form and age in the view of #CWC2023— Satish Reddy (@itssatishreddy) February 5, 2020
पहिल्या वनडे सामन्यासाठी असा होता भारतीय संघ-
भारतीय संघ-
पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केदार जाधव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.
विराट, द्रविडनंतर 'शतकवीर' श्रेयस अय्यरनेही न्यूझीलंडमध्ये केला खास कारनामा
वाचा👉https://t.co/mQ3YIcQfkA👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @ShreyasIyer15— Maha Sports (@Maha_Sports) February 5, 2020
ना सचिन; ना रोहित; ना अजिंक्य; अशी कामगिरी करणारा श्रेयस पहिलाच मुंबईकर
वाचा- 👉https://t.co/9r3FvRMecJ👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @ShreyasIyer15— Maha Sports (@Maha_Sports) February 5, 2020