भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेत यजमान भारतीय संघ 2-0 ने पिछाडीवर आहे. पाहुण्या संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले. आता मालिकेतील शेवटचा आणि तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी ही मालिका महत्त्वाची आहे.
1 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मुंबई कसोटीसाठी सर्व खेळाडू तयारी करतील, असे संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे. संघ व्यवस्थापनाने कोणतेही वैकल्पिक प्रशिक्षण सत्र न घेण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठांनाही दिवाळीची सुट्टी मिळालेली नाही. तिसरा कसोटी सामना जिंकून आपली इभ्रत वाचवण्याच्या इराद्याने भारत मैदानात उतरणार आहे. अशा परिस्थितीत, दिवाळीनंतर टीम इंडियाचे आगामी सामने कोणासोबत होणार आहेत हे जाणून घेऊया.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारत चार 20 सामने खेळेल. या मालिकेतील पहिला सामना डर्बन येथे 8 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना 10 नोव्हेंबर रोजी गेबरा, तिसरा सामना 13 नोव्हेंबर रोजी सेंचुरियन व अखेरचा सामना 15 नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेवर तुझ्या मालिकेनंतर क्रिकेट जगतातील सर्वच चर्चित मालिकांपैकी एक मालिका मानल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेचा शुभारंभ 22 नोव्हेंबर रोजी पर्थ येथे होईल. त्यानंतर थेट 6 डिसेंबर रोजी ऍडलेड येथे दिवस-रात्र कसोटी होणार आहे. त्यानंतर ब्रिस्बेन येथे 14 डिसेंबरपासून तिसरा सामना होईल. मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी खेळली जाईल. तर, अखेरचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे होणार आहे. भारतीय संघाने मागील दोन मालिकांत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत करण्याची किमया केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; केकेआर ‘या’ 5 खेळाडूंना करणार रिटेन? कर्णधाराचा पत्ता कटणार
AUS vs PAK; टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, पण कर्णधाराचीच नाही केली घोषणा!
पंत नाही तर ‘हा’ होता, बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी जिंकवणारा खरा हीरो, दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य!